अर्धशतकापासून बेलाटी गावातील २५० कुटूंब अतिक्रमीत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:33 AM2020-12-29T04:33:47+5:302020-12-29T04:33:47+5:30
घरे नियमानुकुल करण्याची ग्रामस्थांची मागणी २८लोक२० के लाखांदूर : गावातील शासकीय जमिनिवर अतिक्रमण करुन जवळपास २५० कुटुंबांनी घराचे बांधकाम ...
घरे नियमानुकुल करण्याची ग्रामस्थांची मागणी
२८लोक२० के
लाखांदूर : गावातील शासकीय जमिनिवर अतिक्रमण करुन जवळपास २५० कुटुंबांनी घराचे बांधकाम करुन वास्तव्यास आहेत.मात्र अर्धशतकापेक्षा अधिक काळ लोटूनही अतिक्रमनधारक कुटुंबांची घरे नियमानुकुल न करण्यात आल्याने तालुक्यातील बेलाटी गावातील अतिक्रमण धारकांची ग्रा.पं. निवडणूक उमेदवारी धोक्यात असल्याचे येथील गावक-यांनी सांगितले.
प्राप्त माहिती नुसार, 9 सदस्यीय गट ग्रामपंचायत असलेल्या तालुक्यातील बेलाटी गावात जवळपास २५० घरे अतिक्रमीत जमिनिवर असल्याची माहिती आहे. सदर घरांचे बांधकाम अर्धशतकापुर्वी झाले असतांना ग्रा.पं.च्या नमुना ८ अभिलेखात मालक म्हणून सरकार अशी नोंद असुन अतिक्रमनकर्त्या नागरिकाचे नाव देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि अतिक्रमणकर्त्या नागरिकाच्या नावाने घरकर वसुल केला जात असला तरी मूळ मालक सरकार असल्याने या गावातील जवळपास २५० कुटुंबातील नागरिक व युवक ग्रा.पं. निवडणुकीत उमेदवार म्हणून अपात्र ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, तालुक्यात ११ गट ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाला प्रारंभ झाल्याने सर्वत्र उमेदवारांची नामनिर्देशनासाठी धावपळ दिसून येत असली तरी तालुक्यातील बेलाटी गावातील २५०कुटुंबातील युवक व नागरिक केवळ मतदार म्हणून हक्क बजावनार उमेदवार म्हणून नाही...? असे सर्वत्र बोलले जात आहे. एकंदरीत लोकशाहीत मतदार व उमेदवार या दोघांनाही समांतर अधिकार दिले असले तरी अतिक्रमणाच्या विळख्यात बेलाटी गावातील नागरिक उमेदवारिच्या अधिकार मिळण्यासाठी अतिक्रमीत घरे नियमानुकुल करण्याची मागणी करतांना दिसत आहेत.
दरम्यान, गत अर्धशतकापुर्वी पासूनची अतिक्रमीत घरे नियमानुकुल करण्यासाठी २८ डिसेंबर रोजी बेलाटी येथील काही नागरिकांनी माजी समाजकल्यान सभापती चंद्रशेखर टेंभूर्ने यांच्या नेतृत्वात लाखांदूरचे तहसिलदार निवृत्ती उइके यांची भेट घेत चर्चा करुन सदर प्रकरणी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याची देखील मागणी केली आहे.