वर्षभरात मद्यपींनी रिचविली
By admin | Published: April 19, 2015 12:32 AM2015-04-19T00:32:09+5:302015-04-19T00:32:09+5:30
गावांगावात दारु बंदी झाल्याविषयीची चर्चा वर्षभर सुरु होती. ..
५९ लाख लिटर दारु
भंडारा : गावांगावात दारु बंदी झाल्याविषयीची चर्चा वर्षभर सुरु होती. महिलांच्या पुढाकारात अनेक आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात निर्मल ग्राम योजनेंतर्गत पुरस्कारप्राप्त गावांची संख्या वाढल्यानंतरही भंडारा जिल्ह्यात दारुचा पाहुणचार करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढली आहे. याचा प्रत्यय मागील ११ वर्षांपासून नोंद केलेल्या दारु विक्रीच्या आकडेवारीवरुन लक्षात येते. सन २००४-२००५ ते २०१४ -२०१५ पर्यत जिल्ह्यात एकूण ५ कोटी २० लाख १४ हजार ७१० लीटर दारुची विक्री करण्यात आली.
सन २०१४ -२०१५ मध्ये मद्यपिंनी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक दारु यावर्र्षी एकूण ५९ लाख २९ हजार ४३३ लीटर दारु जिल्हावासीयांनी रिझविली. तसेच सन २०१३-२०१४ मध्ये ५४ लाख ४५ हजार ८७० लीटर दारु मद्यपिंनी रिझविली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ लाख ८३ हजार ५६३ लीटर दारुविक्रीत वाढ झाली.
येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार सन २०१४-२०१५ मध्ये सर्वाधिक दारु आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मे २०१४ मध्ये विक्री झाली. मे महिन्यात ६ लाख १९ हजार १५८ लीटर दारु विक्रीची नोंद आहे. तर सर्वात कमी दारु सप्टेंबर २०१४ महिन्यात विकल्या गेली.
यात ३ लाख ८७,७७० लीटरचा समावेश आहे. याप्रमाणे एप्रील महिन्यात ५ लाख ५८,५०७ लीटर, जूनमध्ये ५ लाख ६३,१८४ लीटर, जुलै महिन्यात ४ लाख ६७,१३६ लीटर, आॅगस्टमध्ये ४ लाख ६६,७७३ लीटर, आॅक्टोंबरमध्ये ४ लाख ५६,५१० लीटर, नोव्हेंबरमध्ये ४ लाख ५२,१०६ लीटर, डिसेंबर महिन्यात ४ लाख ८८,९४५ लीटर, जानेवारी २०१५ मध्ये ४ लाख ९४,३९३ लीटर, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ४२,८३५ लीटर आणि मार्च महिन्यात ५ लाख ३२,१५२ लिटर दारुची विक्री करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)
अवैध दारु विक्रीच्या ४२३ प्रकरणांची नोंद
भंडारा जिल्ह्यात अवैध दारु विक्रीचा आलेख मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात अवैध दारु विक्रीचे एप्रील २०१४ ते मार्च २०१५ पर्यत एकूण ४२३ प्रकरणांची नोंद केली आहे. यात ३०५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून ३० लाख ४८ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये सन २०१३ -१४ मध्ये ३९९ पंजीकृत करण्यात आले होते. यात ३०७ जणांना अटक करण्यात आले होते. त्यांच्या जवळून २७ लाख २८ हजार ३७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सन २०१४ - १५ मध्ये मद्यपिंची आवड देशी दारु आहे. आकडेवारी लक्षात घेता व्दितीय स्थानावर विदेशी आणि तृतीय स्थानावर बियरचा समावेश आहे.