परदेशामध्ये वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:34+5:302021-08-29T04:33:34+5:30
परदेशात गाडी चालविण्याचेही काही नियम आहेत. त्यात भारत सरकार परदेशात वाहन चालविण्याचा परवाना देत असते. परवाने नियमानुसार एका वर्षाने ...
परदेशात गाडी चालविण्याचेही काही नियम आहेत. त्यात भारत सरकार परदेशात वाहन चालविण्याचा परवाना देत असते. परवाने नियमानुसार एका वर्षाने नूतनीकरण करता येतात. त्याची ही सोपी पद्धत आहे. त्या अंतर्गत परवाने विहित नमुन्यात दिलेल्या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा केल्यास परवान्याचे नूतनीकरण करून मिळते. गत दशकभरात विदेशात वाहन चालविण्याचे भंडारा जिल्ह्यातून ६७ जणांनी परवाने तयार केले होते.
बॉक्स
असा काढा ऑनलाइन वाहन परवाना
परदेशात वाहन चालविण्यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यावश्यक आहे. यासाठी नागरिक आयडीपीसाठी अर्ज दाखल करतात. आरटीओ कार्यालयात अर्ज दाखल करून लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग चाचणी द्यावी लागते. सहा महिन्यांसाठी लर्निंग लायसन्स प्रदान केले जाते. आणि या कालावधीत परवाना कायम करण्यासाठी अर्ज करावा लागतो. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
बॉक्स
कोण काढतो हा वाहन परवाना
नोकरीनिमित्ताने परदेशात गेलेले किंवा विविध अभ्यासक्रमांसाठी परदेशात गेलेले विद्यार्थी परवाना काढू शकतात. या परवान्याचा उपयोग फक्त वर्षभरासाठी असला तरी अन्य देशांमध्ये ओळख पटविण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. गत चार वर्षांत जिल्ह्यातील फक्त सतरा जणांनी आयडीपीसाठी अर्ज दाखल केले होते.
कोट
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी एक प्रक्रिया आहे. तशीच प्रक्रिया परवाना नूतनीकरणासाठीही आहे. आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून शुल्काचा भरणा करून परवान्याचे नूतनीकरण करता येते. त्यात असलेल्या नियमांचे पालन करावे.
राजेंद्रकुमार वर्मा
-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा