जिल्ह्यात पाच ठिकाणी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:59+5:302021-04-30T04:44:59+5:30
भंडारा : काेराेना संसर्गाचा उद्रेक हाेत असून, रुग्णांना माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण ...
भंडारा : काेराेना संसर्गाचा उद्रेक हाेत असून, रुग्णांना माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी कुणाचा प्राण जाऊ नये यासाठी भंडारा जिल्ह्यात पाच ठिकाणी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.
भंडारा जिल्ह्यात गत महिन्याभरापासून काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मृतांचे प्रमाणही वाढले आहे. अशा स्थितीत शासकीय आराेग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात काेराेनाबाधितांवर उपचार केले जातात. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आहे. भंडारा जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रकल्प उभारले जाणार आहे. साकाेली, लाखनी, लाखांदूर, तुमसर आणि पवनी या ठिकाणी हे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रकल्प उभारले जाणार असून, पाचही ठिकाणचे प्रकल्प कायमस्वरूपी जिल्ह्याच्या सेवेत राहणार आहे. येत्या काही दिवसात कामाला सुरुवात हाेऊन लवकरच तेथून रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येईल. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. प्रकल्प कायमस्वरूपी राहणार असल्याने भविष्यातदेखील याचा फायदा हाेणार असल्याची माहिती काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.