ऑक्सिजन ग्रुप करतोय ‘ऑक्सिजन’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:36+5:302021-05-13T04:35:36+5:30

भंडारा : कोरोना संकटाच्या गंभीर काळात ऑक्सिजन मिळवण्यासाठी एकीकडे रुग्णांना वणवण करावी लागत असताना भंडारा शहरात ‘ऑक्सिजन ग्रुप’ च्या ...

Oxygen Group is helping 'Oxygen' | ऑक्सिजन ग्रुप करतोय ‘ऑक्सिजन’ची मदत

ऑक्सिजन ग्रुप करतोय ‘ऑक्सिजन’ची मदत

Next

भंडारा : कोरोना संकटाच्या गंभीर काळात ऑक्सिजन मिळवण्यासाठी एकीकडे रुग्णांना वणवण करावी लागत असताना भंडारा शहरात ‘ऑक्सिजन ग्रुप’ च्या माध्यमातून कोरोना रुग्णांना नि:शुल्क ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘ऑक्सिजन मदत ग्रुप’ नावाने सुरू करण्यात आलेल्या या गटाच्या माध्यमातून सहा मित्र एकत्रित येऊन कोरोना संकटात सामाजिकतेचे भान जपत आहेत. यामुळे कोरोना काळात रुग्णांना मोठा आधार निर्माण झाला आहे.

शहरातील ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे भंडारा शहरातील कोरोना रुग्णांसाठी एक दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी वणवण फिरण्याची गरज आता संपुष्टात आली आहे. भंडारा शहरातील गरजू कोरोना रुग्ण ज्यांची ऑक्सिजन पातळी ८५ ते ९४ पर्यंत आहे. त्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांना हे उपलब्ध करून देण्यात येत आहे. भंडारा शहरातील ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सच्या मालक रोशन काटेखाये यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुपमधील इतर संजय चौधरी, मनीष वंजारी, यश ठाकरे, शालिक अहिरकर, चंद्रेश काटेखाये यांनी एका व्यक्तिकडून उपयोगिता नसलेले १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळविले. त्यानंतर ऑक्सिजन मदत ग्रुप असा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असणे व ऑक्सिजन पातळी ८५ ते ९४ च्या आत असणे गरजेचे आहे. अशा रुग्णांना घरी जाऊन ते तरुण ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर लावून देत आहेत. विशेष म्हणजे ह्यासाठी ते कोणतेही शुल्क घेत नाहीत शिवाय ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्समध्ये येऊन ही तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. ऑक्सिजन मदत ग्रुपच्या मदतीने अनेक गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळाले असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. यामुळे नातेवाईकांची आपल्या रुग्णासांठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी होणारी धावपळ वाचली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी ह्या ग्रुपचे आभारही मानले आहेत.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. अशाप्रसंगी सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर न टाकता आपले सामाजिक दायित्व समजून अनेक लोक मदतीचे हात पुढे करत आहे. त्यात ऑक्सिजनन ग्रुप मदतीचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

बॉक्स

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध

भंडारा शहरात ‘ऑक्सिजन ग्रुप’ च्या माध्यमातून कोरोना रुग्णांना नि:शुल्क ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘ऑक्सिजन मदत ग्रुप’ नावाने सुरू करण्यात आलेल्या या गटाच्या माध्यमातून सहा मित्र एकत्रित येऊन कोरोना संकटात सामाजिकतेचे भान जपत आहे.

Web Title: Oxygen Group is helping 'Oxygen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.