१५ दिवसांत होणार ऑक्सिजन प्लँटची निर्मिती ▪ कोविड सेंटर येथे होणार १५० खाटांची व्यवस्था ▪ लाखांदुर तहसीलदारांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:32+5:302021-05-20T04:38:32+5:30
कोरोना पार्श्वभूमीवर जवळपास दोन महिन्यांपूर्वी येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राअंतर्गत गत ...
कोरोना पार्श्वभूमीवर जवळपास दोन महिन्यांपूर्वी येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राअंतर्गत गत काही महिन्यांपासून बाधित रुग्णांवर आवश्यक उपचार केले जात आहेत. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी शासन व जिल्हा प्रशासनाद्वारे येथील कोविड केअरमध्ये जवळपास ७४ बेडच्या सुविधेसह १३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, ६१ ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर, फ्लो मीटरसहित अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहे. ऑक्सिजन प्लँटच्या बांधकामाचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. येत्या १५ दिवसांत त्याचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे तहसीलदार मेश्राम यांनी सांगितले. कोविड केअर सेंटरची इमारत दुमजली असल्याने वरच्या मजल्यावर रुग्णाला उपचारासाठी स्ट्रेचरच्या साहाय्याने नेण्यासाठी लवकरच रँप तयार केला जाईल, अशी माहिती दिली.
बॉक्स
तालुक्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात
गत काही दिवसांपासून शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत कोविड चाचणीदरम्यान कोरोनाबाधित रुग्ण कमी आढळून येत असल्याने तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तालुक्यात शासन प्रशासनाद्वारे आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याने कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
===Photopath===
190521\img_20210409_193455.jpg
===Caption===
लाखांदपर येथील कोविड केअर केंद्राची ईमारत