जिल्हा रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन टँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:50+5:302021-05-01T04:33:50+5:30

आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता वाढणार : प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची ...

Oxygen tank to be set up in district hospital | जिल्हा रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन टँक

जिल्हा रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन टँक

Next

आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता वाढणार : प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार

भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण होत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. ही समस्या गांभीर्याने घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी १ कोटी २८ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देऊन लवकरच २० केएल ऑक्सिजन टँक भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहे.

मागील वर्षी कोविड संसर्गाच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व खा. प्रफुल्ल पटेल यांनी कोविडची आढावा बैठक घेतली होती. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभारण्याचे व आरटीपीसीआर चाचणी मशीन लावण्याची सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. तसेच यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन खा. पटेल यांनी मागील तीन - चार दिवसांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच शासनाशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १ कोटी २७ लाख ७८ रुपयांच्या २० केएल ऑक्सिजन टँक व आरटीपीसीआर मशीनसाठी २७ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे भंडारा येथे लवकरच आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दररोज जवळपास ५०० आरटीपीसीआर चाचण्या भंडारा येथेच होणार असल्याने नागपूरला नमुने पाठविण्याची अडचणसुद्धा दूर होणार आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांचे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष असून ते सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. माजी आ. राजेंद्र जैनसुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Oxygen tank to be set up in district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.