अतिवृष्टीने कापलेले धानपीक जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:00+5:302021-09-23T04:40:00+5:30

चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात पाऊस न थांबल्यास हाती आलेले धानपीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. गेले चार पाच ...

Paddy crop cut by heavy rains | अतिवृष्टीने कापलेले धानपीक जमीनदोस्त

अतिवृष्टीने कापलेले धानपीक जमीनदोस्त

Next

चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात पाऊस न थांबल्यास हाती आलेले धानपीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. गेले चार पाच दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे हलक्या प्रतीचे धान जे कापायला आलेले आहेत, ते शेतात पूर्णपणे पावसामुळे झोपले आहे. अनेक शेतकऱ्यांनी धान पीक कापण्यास आल्याने ते कापले. पण ते पावसामध्ये सापडल्याने धान पिकाच्या कडपा पाण्यात सापडल्या आहेत. धानाची लोंब पूर्णत: पाण्यात बुडाले असून, त्यांना कोंब फुटण्याच्या मार्गावर आहे. धान पिकावर या भागात विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था होत आहे. धानाच्या लोंबा पूर्णपणे भरले आहेत. ते कापण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी दररोज पाऊस पडत राहिल्यास धानपीक मातीमोल होईल, त्यामुळे उत्पादनात घट होईल. बाम्हणी येथील शेतकऱ्यांच्या शेतात धान कापले असून पूर्णपणे पाण्यात सापडले आहे. दुरवस्थेची कारण निसर्ग ठरत आहे. निसर्गराजाने कृपा करून पावसाला विश्रांती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

220921\img_20210921_180733.jpg

ब्राम्हणी येथिल शेतात पाण्याखाली आलेले धनपिक

Web Title: Paddy crop cut by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.