क्रीडांगणाच्या जागेवर कसली जाते धान शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:05+5:302021-09-18T04:38:05+5:30
या गटावर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून तिथे धानाची शेती केली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ...
या गटावर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून तिथे धानाची शेती केली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण राहिलेले नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास खुंटला आहे. तसेच याच गटाला लागून असलेल्या गट क्र. ३० हाही शासकीय गट असून हा गट ०. ११ हे. आर जागेचा आहे. तो गट जिल्हा परिषदच्या नोंदीप्रमाणे शौचाकरिता राखीव असल्याची आपल्या दस्तऐवजात नोंद आहे. याही गटावर त्याच व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर खेळ व खेळाडूंसाठी अनेक प्रकारच्या सुविधा व्हाव्यात म्हणूनही विविध योजनांच्या माध्यमातून क्रीडांगणासाठी अनुदानही दिले जाते. हे अतिक्रमण हटविण्यात यावे याकरिता ग्रामपंचायत सदस्य डुलिचंद यांच्या नेतृत्वात १२४ गावकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना देण्यात आले. आता प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे चान्ना ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.