धान निसवले पण लोंबीत दाणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:12 PM2017-10-08T21:12:11+5:302017-10-08T21:13:32+5:30

लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कार्यालयांतर्गत नवीनच रोगाचा प्रादूर्भाव अनुभवास मिळाला आहे.

 Paddy escapes, but there is no grain in it | धान निसवले पण लोंबीत दाणाच नाही

धान निसवले पण लोंबीत दाणाच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देनिसर्गाचा प्रकोप : शेतकरी हतबल, सुधारित पैसेवारी वास्तविकतेवर मागणी, चित्रीव लोंबीने शेतकरी त्रस्त

मुखरू बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कार्यालयांतर्गत नवीनच रोगाचा प्रादूर्भाव अनुभवास मिळाला आहे. धान निसण्यानंतर लोंबीतील दाणे पांढरेच राहणे व नंतर दाणे लालसर, काळे पडून लोंबी फेचट असण्याचा रोग शेतकºयांना दिसत असल्याने झालेल्या धानाला निसर्गाचा फटका बसत आहे.
पालांदूर परिसरात हलके व मध्यम धान अंतिम टप्प्यात आले आहे. पावसानेही साथ दिल्याने धानाला अपेक्षित उतारा मिळणे निश्चितच असताना मागील ७-८ दिवसापासून नव्या रोगाने हजेरी लावल्याने संकट उभे झाले आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत १०,३९८ हेक्टरवर धानाची रोवणी आटोपली असून ९८ टक्के रोवणी पूर्ण झाली आहे. घाबरलेल्या शेतकºयांनी नुकसानग्रस्त लोंबीच मंडळ कृषी कार्यालयात, कृषीमित्र, कृषी सेवा केंद्रात दाखवून नेमक्या रोगाची ओळख व उपचारविषयी माहिती घेतली. यात वेळीच उपाय केल्यास रोग नियंत्रण शक्य असल्याचे निदर्शनास आले. रविवारच्या वादळवाºयासह पाऊस, किडीचा प्रादुर्भाव यातून धानपिकाचे सुमार नुकसान झाले आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसात परतीच्या पावसाचा अंदाज बघता शेतकºयांची नुकसान शक्य असल्याने सुधारित आणेवारी वास्तविकता लक्षात घेऊनच शेतकरी हितार्थ जाहीर करावी अशी मागणी आहे.
लाखनी तालुक्यातील काही शेतात धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. धानपिकाला विशिष्ट टप्प्यात योग्य खताची मात्रा व किडनाशकाची फवारणी योग्य वेळी केल्यास अंतिम टप्प्यात धानाला धोका टाळता येतो. रोग लागल्यानंतर फवारणी केल्यास नुकसान भरून निघत नाही. करपा, पर्णकोष करपा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे व कोडी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. धान निसवल्यानंतर मुख्य खोड हिरवे दिसत असून टोकाकडील भाग ठिबक्यांनी असते. पानावरही डाग असतात. कोळी हा किटक असून त्याच्यापासून लोंबीला नुकसान होत आहे. हा रोग भातावर नवीनच असल्याने शेतकºयांनी याची जाणीव करून घ्यावी. याच्या नियंत्रणाकरिता फ्रेफेनफॉस ५० इसी १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
-डॉ.जी.आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार कृषी संशोधन केंद्र, साकोली.
पालांदूर परिसरात धानावर करपा, पर्णदोष करपा यांचे प्रादुर्भाव जाणवला असून पर्णकोष करपा हा प्रथम लक्षात येणे महत्वाचे आहे. शेतकºयांनी अभ्यासात्मक दृष्टी ठेवून निरीक्षण करून फवारणी करावी. धानपिकावर लोंबीच्या जवळ कोळी हा किटक आढळला असून यातूनच पुढचा पर्णकोष करपा मार्ग काढतो. प्रथम शिड माईड व नंतर शिडब्लाइंड मध्ये रुपांतर होते. नियंत्रणाकरिता प्रोफेनफॉस १० लि. पाण्याला १५ मिली, प्रेपिकोनॉझोल १० लि. १० मिली पाण्यातून फवारावे. फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी. हातातोंडावर येणार नाही. विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
-मंगेश घोळके, मंडळ कृषी अधिकारी पालांदूर (चौ.)

Web Title:  Paddy escapes, but there is no grain in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.