धान फुलोऱ्यावर, उत्पादनात वाढीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:46 PM2018-09-09T21:46:02+5:302018-09-09T21:46:41+5:30

कोरडवाहू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जात असून ९० ते ११० दिवसांचे धानाचे पीक सध्या फुलोºयावर आहेत. समाधानकारक पाऊस व स्वच्छ ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत.

Paddy florist, expectation of growth in production | धान फुलोऱ्यावर, उत्पादनात वाढीची अपेक्षा

धान फुलोऱ्यावर, उत्पादनात वाढीची अपेक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देपिकासाठी वातावरण पोषक : आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे शेतकºयांना मिळाला दिलासा

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोरडवाहू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जात असून ९० ते ११० दिवसांचे धानाचे पीक सध्या फुलोऱ्यावर आहेत. समाधानकारक पाऊस व स्वच्छ ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
करडी परिसरात सुमारे ६ हजार हेक्टरवर धान पिकाची रोवणी केली जाते. त्यातच निसर्गावर अवलंबून असणाऱ्या धानाच्या शेतीचे प्रमाण अधिक आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या लागवडीला प्राधान्य दिले असून सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले जात आहे. कोरडवाहू पट्ट्यात सिंचनाच्या फारशा सुविधा नसल्याने शेतकरी कमी दिवसात उत्पादन देणाऱ्या धानाला पसंती देतात.
कीटकनाशकांची मागणी वाढली
सध्या धान पिकावर काही प्रमाणात कडा करपा रोगाचा प्रादूर्भाव जाणवत आहे. त्याचबरोबर पाणथळ शेतीला खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी आदींचा प्रकोप दिसून येत आहे. कीड व रोगांची सुरुवात धानावर दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. फवारणी करण्यासाठी किटकनाशकांची मागणी वाढली आहे.
युरियाचा खताचा तुटवडा
सध्या उच्च प्रतीचे धान तरुणावस्थेत आहे. शेतकऱ्यांनी चिखलणीच्या वेळी दिलेला युरिया व मिश्र खताचा डोज आता संपुष्टात आलेला असून दुसरा डोज देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात युरियाची गरज आहे. परंतु अनेक कृषी केंद्रात युरिया खताचा तुटवडा दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.

Web Title: Paddy florist, expectation of growth in production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.