धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:28+5:30

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही कर्जमुक्त करण्याची आश्वासने शासनाने दिली असली तरी सध्याचे शासन यासबंधाने शेतकऱ्यांना चिंंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

Paddy growers will get Rs 500 | धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ

धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ

Next
ठळक मुद्देनाना पटोले : लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सभागृह, प्रयोगशाळा व वर्गखोलीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : केंद्र व राज्य पुरस्कृत आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत धान श्रेणीनुसार जवळपास १८४० रुपये प्रती क्विंटल आधारभूत मूल्य दिले जात आहे. मात्र या किमतीत राज्य शासनाने ५०० रुपयांची दरवाढ केल्याने आता धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाला प्रती क्विंटल २३४० रुपये भाव मिळणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी आयोजीत सभागृह, प्रयोगशाळा व वर्गखोली उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, महिला प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य प्रमीला कुटे, देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप बुराडे, शुद्धमता नंदागवळी, प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, तहसीलदार संतोष महल्ले, ठाणेदार शिवाजी कदम, जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता कैलाश शहारे, तत्वराज अंबादे, सुभाष राऊत, भुमेश्वर महावाडे, ईश्वर घोरमोडे आदी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही कर्जमुक्त करण्याची आश्वासने शासनाने दिली असली तरी सध्याचे शासन यासबंधाने शेतकऱ्यांना चिंंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही. घरकुल बांधकामाच्या सहायाने चौरासातील झुडुपी जंगल नियमाने पिडीत लाभार्थ्यांना न्याय मिळण्याहेतू राज्य शासनाला आवश्यक त्या सुचनादेखील करणार आहे. गोरगरीब जनतेसह शेतकरी शेतमजुरांना व बेरोजगारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास अंगीकारावा, असे आवाहन केले.
यावेळी हजारो नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्तविक जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य के. एस. ईनमुलवार यांनी केले. संचालन राजेश्वरी शेंडे व लक्ष्मण बगमारे यांनी तर, आभार प्रदर्शन ए. बी. पारधी यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकत, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Paddy growers will get Rs 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.