धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:45 AM2017-12-25T00:45:22+5:302017-12-25T00:45:34+5:30

Paddy growers will get subsidy subsidy | धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान मिळणार

धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्देपरिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश : मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबीचा विचार लक्षात घेता शासनातर्फे शेतकऱ्यांना सरसकट धानाला प्रति क्विंटल ३०० रूपये याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्याची मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी भात उत्पादक शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानपोटी प्रति हेक्टरी ६,८७० ते रूपये २३,२५० इतकी मदत मिळणार असल्याची आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना ६० क्विंटलपर्यंत २०० रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा विधानपरिषद सभागृहात केली.
यावर्षी भंडारा-गोंदिया तसेच धान उत्पादक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याने धान रोवणी केलेली नाही तर काही शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे रोवणी केली. त्यातच यावर्षी तुडतुडा रोगामुळे धानपिक संपूर्ण सरसकट नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे. त्यामुळे शेतकºयांना धान पिकाच्या रोवणी करीता बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे सुद्धा कठीण झाले आहे. या निर्णयामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे आ. फुके यांनी सांगितले.

Web Title: Paddy growers will get subsidy subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.