सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 01:08 AM2020-07-22T01:08:33+5:302020-07-22T01:09:08+5:30

भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली.

Paddy planting on 1.5 lakh hectares was delayed | सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

Next
ठळक मुद्देपावसाची दडी : एक लाख ६१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार हेक्टरवरच रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली आहे. एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३९५ हेक्टरवर रोवणी झाली आहे. एकुण क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी आटोपली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत.
भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली. परंतु गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पाऊस कोसळत आहे. काही भागात तर पावसाचे दर्शनही झाले नाही. परिणामी रोवणी रखडली आहे. भंडारा तालुक्यात २१३०६ हेक्टर रोवणीचे क्षेत्र असून आतापर्यंत केवळ १९५७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. मोहाडी तालुक्यातील २७०९६ हेक्टर पैकी ५७३० हेक्टर, तुमसर तालुक्यात २७ हजार ५६९ हेक्टरपैकी ५३२५ हेक्टर, पवनी १८ हजार ६९२ हेक्टर पैकी २९६९ हेक्टर, साकोली १८ हजार ५०१ हेक्टर पैकी ८७४० हेक्टर, लाखनी २२ हजार ६३१ हेक्टर पैकी ६७१२ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यातील २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रापैकी ५७९८ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. नियोजित क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी झाली आहे.
पावसाने दडी मारल्याने रोवणी रखडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३० मिमी असून आतापर्यंत ४४६.२ मिमी पाऊस कोसळला आहे. त्यातही अनेक भागात पावसाने दर्शनच दिले नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय रोवणी करणे शक्य नाही. ओलीताची सोय असलेले शेतकरी रोवणी करीत असले तरी त्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. रोवणी लांबल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक सर्वसाधारण धानाची लागवड केली जाते. कमी कालावधीत निघणारा हा धान असून रोवणीस उशीर झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.

जिल्ह्यात सरासरी ४४६ मिमी पावसाची नोंद
भंडारा जिल्ह्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ४४६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुका ५५९ मिमी, मोहाडी ४०७.६ मिमी, तुमसर ३०४.० मिमी, पवनी ४५०.७ मिमी, साकोली ५१२.८ मिमी, लाखांदूर ३३७.२ मिमी आणि लाखनी ५५१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २१ जुलै पर्यंत प्रत्यक्ष पडणाºया पावसाच्या तुलनेत हा पाऊस ९० टक्के असला तरी रोवणीयोग्य मात्र निश्चितच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणी रखडल्याचे दिसत आहे.

Web Title: Paddy planting on 1.5 lakh hectares was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.