धान उत्पादक निराशेच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 09:43 PM2018-11-23T21:43:48+5:302018-11-23T21:44:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा (कोसरा) : कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कोंढा येथे शेतकऱ्यांच्या धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली ...

Paddy producers in despair shade | धान उत्पादक निराशेच्या छायेत

धान उत्पादक निराशेच्या छायेत

Next
ठळक मुद्देअत्यल्प भाव : अपुऱ्या पावसाने चौरास भागात दुष्काळाची तीव्रता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कोंढा येथे शेतकऱ्यांच्या धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेने धानाचे प्रति क्विंटल १८०० ते २००० रूपये भाव असल्याने धानाची शेती परवडणारी नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. सध्याचे धानाचे भाव चार वर्षापासून तेच आहे. कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
चौरास भाग हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी या भागात अत्यल्प पाऊस पडला. डाव्या कालव्यात वेळेवर धरण विभाग वाही पवनी यांनी पाणी सोडल्याने बऱ्यापैकी धानाचे उत्पादन कोंढा परिसरात झाले. कोरडवाहू शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. ही बाजू सोडता परिसरात बºयापैकी धानाचे पिक झाले. अवकाली पाऊस तसेच किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाल्याने प्रत्येक शेतकºयांचे उत्पादन वाढले. गेल्या चार वर्षापासून या भागातील शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे. यावर्षी चांगले उत्पादन झाले म्हणून दोन पैसे जमा होईल. या आशेवर शेतकरी होता. परंतु उत्पादन निघाल्यावर शेतकºयांची निराशा झाली आहे. धानाचे भाव मागील चार वर्षापुर्वी जे होते तेच आहे. या भागातील शेतकरी धानाचे बारीक व ठोकळ अशा प्रकारचे पीक घेत असतो, ठोकळ धानाला शासनाने १७५० रूपये प्रती क्विंटल भाव जाहीर केले. तसेच २०० रूपये बोनस मिळाल्यास १९५० रूपये भाव शेतकºयांना मिळणार आहे.
बारीक धानाचे पीक घेणाºया शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार कोंढा येथे १८०० रूपये ते २००० रूपये प्रतिक्विंटल मिळत आहे. हे भाव २०१४ मध्ये सुद्धा होते. शासन बारीक धान उत्पादक शेतकºयांना योग्य न्याय देऊ शकले नाही. मागील चार वर्षापासून धानाचे भावात वाढ न झाल्याने शेतकरी निराश झाले आहे. दरवर्षी रासायनिक खत, औषधी, बि-बियाणे, मंजुरी यांची वाढ होते. पण धानाचे भाव वाढत नाही. धान भरडाई करून तांदुळ बनविले तर ते देखिल ३००० ते ३५०० रूपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्त भाव मिळत नाही. या सर्वपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्व शेतकºयांचे परिसरात धानाचे पिक निघाले बारीक प्रतीचे धान बाजार समितीच्या उपबाजारात विकण्या शिवाय पर्याय नाही म्हणून येथील खुल्या जागेत शेतकऱ्यांनी धानाचे पोते आणून ठेवले आहे. त्यामुळे उपबाजारात एकच गर्दी वाढली आहे.
धान्य खुल्या जागेत
कृषी उत्पन्न बाजार समिती, पवनी अंतर्गत कोंढा येथे समितीने उपबाजार सुरू केला आहे. हा परिसर धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने येथे शेतकरी उत्पादन झाल्याबरोबर धानाचे पोते ठेवत असतो. हा बाजार देखिल सर्व देत नाही, असे देखिल प्रकार उपबाजार कोंढा येथे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्य समस्या सोडविण्याची मागणी कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Paddy producers in despair shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.