धान उत्पादक जगताहेत अधांतरी

By Admin | Published: November 19, 2015 12:24 AM2015-11-19T00:24:33+5:302015-11-19T00:24:33+5:30

संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़

Paddy producers live up to | धान उत्पादक जगताहेत अधांतरी

धान उत्पादक जगताहेत अधांतरी

googlenewsNext

धान खरेदी केंद्राचा अभाव : भाव मिळण्यासाठी शासन दरबारी नेतृत्वाची गरज
साकोली: संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़ बळीराजाने उत्पादन केलेल्या धानाला पुरेसाभाव मिळण्यासाठी सरकारशी भांडणाऱ्या लोकनेत्यांचा अभाव दिसत असल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़
धान उत्पादकांचा खंबीर वालीच नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला दिसत आहे़ धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून, धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी शासन दरबारी भांडणाऱ्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे़ भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांकडून सहानुभूमी मिळवून राजकीय यशोशिखर गाठणारे महाभाग बरेच आहेत़ राज्यातील कापूस, ऊस व इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सवलती मिळवून देण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून शासन दरबारी एकत्र भांडणारे लोकप्रतिनिधी राज्यातील काही भागात असल्याने आज कापसाला व इतर पिकाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़ तो प्रकार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसून येत नाही़ गावातील सभामंचावरून शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखविणाऱ्या दमदार लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी धान उत्पादकांच्या व्यथा मांडून त्या दुर सारण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे़ धान उत्पादकांना शेतामधून धानाचे पिक घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़
त्यातल्या त्यात खताच्या वाढलेल्या किमती तसेच किटकनाशक,वाढलेली मजुरी, बियाणांचे वाढीव भाव, आणि त्यामानाने उत्पादीत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे़ अल्प प्रमाणात सबसीडीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार अनेकदा केला जातो़ तसेच निसर्गाच्या अवकृपेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Paddy producers live up to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.