दहा दिवसात ४१ लाखांची धान खरेदी उधारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:57 PM2017-11-13T22:57:09+5:302017-11-13T22:57:21+5:30
येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत हमी भावात १ नोव्हेंबरपासून धानखरेदी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत हमी भावात १ नोव्हेंबरपासून धानखरेदी करण्यात आली. ९ नोव्हेंबरपर्यंत २६३५.६ क्विंटल धानाची खरेदी आटोपली असून फेडरेशनने अजुनही पैसे रक्कम शेतकºयांना दिली नाही.
आॅनलाईन सेवेमुळे तत्काळ दैनंदिन खरेदीचे आकडे तिला मार्केटिंगला दिली जात असूनही निधीची व्यवस्था प्रशासनोन न केल्याने उधारीचा व्यवहार पुढे आला आहे. वर्तमानत आॅनलाईन प्रक्रियेमुळे सगळे व्यवहार सोईचे व बिनाविलंब होत आहेत.
मात्र शासन /प्रशासन याची सांगड योग्य नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने धान उधारीवर विकावे लागत आहे. मळणी, बांधणी, कापणी, वाहतूक, हमाली नगदीने द्यावी लागते. नगदी न दिल्यास कामच होत नाही. चालू सत्रात पालांदूर परिसरातील सर्वच खरेदी केंद्रावर इलेक्ट्रिक काट्याने धान खरेदी सुरू आहे. यातून शेतकºयांची लूट थांबवण्यिाला मोठी मदत झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितार्थ खरेदी केंद्रावर रात्रपाळीत रखवालदार नेमण्याची नितांत गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार सतिमीला शेतीअंतर्गत कमीशन मिळतो आहे. त्यातून किमान रक्कम खर्च करीत केंद्रावरील चोरीला जाणाºया धानाला आळा बसविणे गरजेचे आहे.
शेतकºयांना आॅनलाईन रकमेची व्यवस्था केंद्र शासनाअंतर्गत ‘एफएमएस फायनलसिअली सिस्टम प्रणाली अंतर्गत करण्यात येत आहे. ही प्रणाली प्रथमच राबविण्यात येत असल्याने थोडा विलंब होत आहे. या आठवड्याता निधीची व्यवस्था होणे शक्य नाही. एकदा ही प्रणाली कार्यान्वीत झाली की मग अडचण राहणार नाही.
-गणेश खर्चे, जिल्हा मार्गेटिंग अधिकारी भंडारा.