खरेदी केंद्रावर पोत्यात अंकुरले धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 01:12 AM2019-12-29T01:12:45+5:302019-12-29T01:13:16+5:30

भंडारा जिल्ह्यात दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात आधारभूत धान खरेदी केंद्रावरील पोते ओले झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आता दोन दिवसापासून ओले झालेले धान पोत्यातच अंकुरत आहेत. पिंपळगाव सडक येथील सहकारी भात गिरणीद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे.

Paddy sprouted in sacks at the shopping center | खरेदी केंद्रावर पोत्यात अंकुरले धान

खरेदी केंद्रावर पोत्यात अंकुरले धान

Next
ठळक मुद्देअवकाळी पाऊस । पिंपळगाव खरेदी केंद्रावरील प्रकार

चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : अवकाळी पावसाने उघड्यावरील धानाचे प्रचंड नुकसान झाले असून आता खरेदी केंद्रावर पोत्यात असलेला धान अंकुरत आहे. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील केंद्रावर पोत्यात अंकुरलेला धान पाहून शेतकरी धास्तावले आहेत.
भंडारा जिल्ह्यात दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात आधारभूत धान खरेदी केंद्रावरील पोते ओले झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आता दोन दिवसापासून ओले झालेले धान पोत्यातच अंकुरत आहेत. पिंपळगाव सडक येथील सहकारी भात गिरणीद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने ८ हजार क्विंटल धान केंद्राबाहेर पडून आहे. सुमारे ४०० शेतकऱ्यांचे धान ओले झाले आहेत.
सहकारी भातगिरणीद्वारे ४ डिेसेंबरपर्यंत १२ हजार २८० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गोदाम भरल्याने शेतकºयांचा माल केंद्राबाहेर आहे. जुन्या धानाला डिओ मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
त्यातच २६ डिसेंबर रोजी अवकाळी पावसाने उघड्यावरील धान ओला झाला. पोत्यातील ओलाव्यामुळे धान अंकुरले आहेत. ठिकठिकाणी पाणी साचले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. याबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी मानेगाव सडक चे सरपंच नरेंद्र भांडारकर व माजी पंचायत समिती सदस्य दिनेश वंजारी यांनी केली आहे.

धान ठेवायला जागाच नाही
आधारभूत खरेदी केंद्रावर धान ठेवायला जागा नसल्याने शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्गापर्यंत धानाची पोती ठेवली आहेत. पिंपळगाव भात गिरीणीचे शिवणी व गिरोला येथे ३ हजार क्विंटल क्षमतेचे गोदाम आहे. शेतकरी धान केंद्रावर येऊन खरेदीची प्रतीक्षा करीत असतात. परंतु कोणताही इलाज दिसत नाही.

Web Title: Paddy sprouted in sacks at the shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.