धान, ट्रॅक्टर व मळणी मशीन जळून खाक, लाखांदूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 01:21 PM2022-11-19T13:21:55+5:302022-11-19T13:23:15+5:30
लाखांदूर तालुक्यातील सरांडी शिवारात शेषराव समरीत यांच्या शेतात धान मळणीचे काम सरु होते.
- दयाल भोवते
लाखांदूर (भंडारा) : मळणी करताना अचानक लागलेल्या आगीत तीन एकरातील कापणी झालेला धान, ट्रॅक्टर व मळणी मशीन जळून खाक झाल्याची घटना घडली तालुक्यातील सरांडी बुज. येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लाखांदूर तालुक्यातील सरांडी शिवारात शेषराव समरीत यांच्या शेतात धान मळणीचे काम सरु होते. दिनेश ठाकरे यांच्या ट्रॅक्टरने मालकी मळणी सुरू असताना अचानक ट्रॅक्टरमधून ठिणगी निघाली आणि धानाच्या गंजीने पेट घेतला. मळणी यंत्रालाही लागली. हा प्रकार लक्षात येताच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग एवढ्या वरगाने वाढत गेली आणि क्षणार्धातच सर्व जळून खाक झाले.
आठवडाभरातील तालुक्यातील दुसरी घटना
कापणी झालेले धान जळून खाक झाल्याची घटना ही घटना तालुक्यातील दुसरी घटना होय. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील रोहनी शेत शिवारात आनंदराव समरीत यांचे धान पुंजणे ट्रॅक्टर व मशीन जळून खाक झाली होती.