कारवाई करण्यात पाेलिसांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:09 AM2021-02-28T05:09:23+5:302021-02-28T05:09:23+5:30

भाेजापूर येथील डिम्पल वासनिक व जाेत्सना अविनाश वासनिक, तमन्न वासनिक, वत्सला चरण वासनिक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. २८ ...

Paelis avoid action | कारवाई करण्यात पाेलिसांची टाळाटाळ

कारवाई करण्यात पाेलिसांची टाळाटाळ

Next

भाेजापूर येथील डिम्पल वासनिक व जाेत्सना अविनाश वासनिक, तमन्न वासनिक, वत्सला चरण वासनिक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. २८ डिसेंबर राेजी डिम्पल यांची मुलगी उर्वशी खेळत असताना जाेत्सना व वैशाली वासनिक यांना बाॅल लागला. यावरुन डिम्पल वासनिक व सासरच्या मंडळीविरुध्द कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर या मंडळीनी घरात शिरुन डिम्पलला मारहाण केली. या प्रकाराची माहिती पतीला देण्यात आली. त्यानंतर थेट पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविण्यात आली. पाेलिसांनी सासरच्या मंडळींना ठाण्यात बाेलावून ताेडगा काढण्याचा सल्ला दिला. याउलट त्यांनी तक्रारदाराला रिपाेर्ट वापस घेण्याची धमकी दिली. हा प्रकार येथील थांबल्यानंतर सासरच्या मंडळीकडून शिवीगाळ सुरुच हाेती. या त्रासाला कंटाळून डिम्पल यांनी घर साेडून दुसरीकडे राहू लागली. २८ डिसेंबरला पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असला तर पीडित महिलेला त्रासाला सामाेरे जावे लागले नसते. सासरच्या मंडळीकडून डिम्पल यांना धाेका निर्माण झाला असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

बाॅक्स

एक्स-रेमध्ये तफावत

मारहाणीनंतर डिम्पल वासनिक हिचा पायाचा एक्स-रे जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. रुग्णालयाकडून फॅक्चर नसल्याचा रिपाेर्ट दिला. त्यानंतर शहरातीलच डाॅ. कुथे यांच्याकडे एक्सरे करण्यात आला असता तिथे पायाला दुखापत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यासंबंधी रुग्णालयातील एक्स-रे मशीन जुनी असल्यामुळे अहवाल क्लिअर दिसत नसल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. या प्रकरणात लक्ष घालुन पीडित महिलेला न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Paelis avoid action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.