साकाेलीत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर पाेलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:30 AM2021-05-03T04:30:16+5:302021-05-03T04:30:16+5:30

साकाेली : सध्या काेराेनाचा काळ असून पाेलीस यंत्रणा जनतेच्या सुरक्षेसाठी व्यस्त आहे. मात्र जनतेच्या सुरक्षेबराेबरच अवैध धंद्यावरही पाेलिसांची करडी ...

Paelis raid on IPL cricket betting in Sakali | साकाेलीत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर पाेलिसांची धाड

साकाेलीत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर पाेलिसांची धाड

Next

साकाेली : सध्या काेराेनाचा काळ असून पाेलीस यंत्रणा जनतेच्या सुरक्षेसाठी व्यस्त आहे. मात्र जनतेच्या सुरक्षेबराेबरच अवैध धंद्यावरही पाेलिसांची करडी नजर आहे. साकाेलीत शनिवार १ मे राेजी रात्री पाेलिसांनी आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड मारली. यात एक आराेपी पाेलिसांना गवसला तर दुसरा पळून गेला.

पाेलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार साकाेली येथील प्रगती काॅलनी साकाेली येथे मुंबई विरुद्ध चेन्नई या आपीएल क्रिकेटवर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पाेलीस निरीक्षक जितेंद्र बाेरकर यांनी सापळा रचला व प्रगती काॅलनी गाठली. ज्या ठिकाणी हा सट्टा सुरू हाेता. त्या घरासभाेवताल पाेलीस तैनात करण्यात आले व माेठ्या शिताफीने या क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली. यावेळी पंकज हेमराज मुंगुलमारे, रा. प्रगती काॅलनी, साकाेली याला ताब्यात घेऊन क्रिकेट सट्ट्यासाठी वापरत असलेले पाच माेबाईल, टीव्ही, चार्जर असे एकूण एक लक्ष छत्तीस हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. मात्र यावेळी त्याचा दुसरा साथीदार बाबा, रा. तुमसर हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. पाेलिसांनी दाेन्ही आराेपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये कलम ४, ५ नुसार गुन्ह्याची नाेंद केली आहे. ही कारवाई ठाणेदार जितेंद्र बाेरकर, सहायक पाेलीस निरीक्षक सावंत, पाेलीस उपनिरीक्षक फटिंग व पाेलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.

बाॅक्स

ज्यावेळी पाेलिसांनी ही कारवाई केली. त्यावेळी दुसरा आराेपी बाबा, रा. तुमसर हा पाेलिसांना चकमा देऊन पसार झाला. मात्र बाबाला पकडण्यासाठी पाेलिसांची एक चमू त्यांच्या शाेधात असून लवकरच ताे पालिसांना सापडण्याची शक्यता आहे.

Web Title: Paelis raid on IPL cricket betting in Sakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.