वेळेत दुकान बंद करण्यासाठी पाेलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:58+5:302021-07-07T04:43:58+5:30
वरठी : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी अनेक निर्बंध घालून दिले असून सर्व दुकाने दुपारी ४ वाजता बंद करावे लागतात. शहरी ...
वरठी : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी अनेक निर्बंध घालून दिले असून सर्व दुकाने दुपारी ४ वाजता बंद करावे लागतात. शहरी भागासह ग्रामीण भागात वेळेवर दुकाने बंद करण्यासाठी पाेलिसांना दरराेज बाजारपेठेत फेरफटका मारावा लागताे. अनेकदा व्यापाऱ्यांसाेबत हुज्जतही हाेते. दाेन वर्षांपासून व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यात चांगलाच राेष दिसताे. त्यामुळे वेळेत दुकान बंद करण्यासाठी पाेलिसांची माेठी दमछाक हाेते. दंडात्मक कारवाई करूनही दुकाने अनेकदा उशिरापर्यंत सुरू असतात. त्यातच नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागते.
कोरोनाच्या संकटातून अद्याप सुटका झाली नाही. त्यामुळे पहिल्या लेव्हलमधून जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये आला. शिथिल झालेले नियम पुन्हा लागू करण्यात आले. नवीन नियमानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ व शनिवार व रविवार पूर्णतः व्यापार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठान ठरावीक वेळेवर बंद करावे लागतात. या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिसांची दमछाक होताना दिसते. कायदा व सुव्यवस्था राखत नियमाचे काटेकोरपणे पालन करवून घेण्यात घाम फुटत आहे. पोलिसांची गाडी दिसताच दुकानदारांची होणाऱ्या धावपळीने स्थिरता घेतली आहे. मुकाट्याने बंद होणारी दुकाने आता हुज्जत घालत असून दुकान बंद करण्यास मज्जाव करताना दिसतात. जबरदस्तीने दुकाने बंद झाली तरी रस्त्यावरील जत्थे कमी होताना दिसत नाहीत. दरम्यान, पोलीस व सरकार प्रति रोष व्यक्त होताना दिसते. कोरोनाच्या दीर्घ प्रतीक्षेत नागरिकांचा संयम हळूहळू डगमगताना दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
व्यापाराची गती मंदावली
निर्बंधासह बाजारपेठ उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र, उद्योग, व्यवसायाची गती मंदावली आहे. दिवसभर दुकानात बसूनही गिऱ्हाईक फिरकत नसल्याचे दुकानदार सांगतात. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडल्यास उर्वरित सर्व व्यवसायाला कासवगती असल्याने दुकानदारात असंतोष आहे. असाच प्रतिसाद राहिल्यास चरितार्थ कशा चालवावा, असा त्यांचा सवाल आहे.
बाॅक्स
सर्वांना सारखा नियम लावा
निर्बंध पाळण्यास नागरिकांचा विरोध नाही, पण पोलिसांकडून होणाऱ्या दुजाभावला नागरिकांनी नापसंती दर्शविलेली आहे. नियमाची कुऱ्हाड काही ठरावीक दुकानांना लागू असून मोठे व्यावसायिक व मर्जीतील दुकानांना यातून सूट देण्यात येत आहे. गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यांना वेळेचे बंधन नाही. त्यामुळे सर्वांना समान नियम लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.