जिभेचे लाड करा कमी, हॉटेलिंग पडू शकते महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:51+5:30
महिनाभराच्या कालावधीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ४३ रुपयांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे बजेट बिघडले असल्याने त्यांनासुद्धा दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हॉटेलिंगचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांनासुद्धा जिभेचे लाड कमी करावे लागू शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील दोन तीन महिन्यांपासून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १९५६ रुपयांवर पोहचले आहे. सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांचेसुद्धा बजेट बिघडले आहे.
महिनाभराच्या कालावधीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ४३ रुपयांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे बजेट बिघडले असल्याने त्यांनासुद्धा दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हॉटेलिंगचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांनासुद्धा जिभेचे लाड कमी करावे लागू शकतात. हॉटेलिंगच्या दरात वाढ होण्याचे संकेत शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी दिले आहे.
गॅस सिलिंडरने ओतले महागाई तेल
- मागील तीन-चार महिन्यांपासून व्यावसायिक व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १९१३ रुपये तर घरगुती गॅस सिलिंडर ९४५ रुपयांवर पोहचला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाईत भर पडत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडले आहे.
साराच खर्च वाढला
व्यवसायाची गाडी रुळावर येत असताना गॅस सिलिंडर, खाद्य आणि इतर वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यामुळे दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसून व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या महागाईचा फटका केवळ सर्वसामान्यांना नव्हे तर हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे.
-सुरेश पंचभाई, हॉटेल व्यावसायिक