चिचोलीत धान पिकाचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:33 PM2017-11-07T23:33:30+5:302017-11-07T23:33:54+5:30
तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, मोखटोला येथील शेतकºयांच्या धानपिकाला मावा, तुडतुडासारख्या अनेक किडीच्या प्रादुर्भावाने पीक फस्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, मोखटोला येथील शेतकºयांच्या धानपिकाला मावा, तुडतुडासारख्या अनेक किडीच्या प्रादुर्भावाने पीक फस्त केले. यामुळे येथील शेतकºयांच्या शेकडो ऐकरातील धानपिक करपले. चिचोलीचे तलाठी के.के. गोस्वामी यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या धानपिकाची पाहणी पंचनामा केला. यावेळी सरपंच अनिता नेवारे, कृष्णकुमार रहांगडाले आदींची उपस्थिती होती. शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
यावर्षी प्रारंभीला वरूण राजाने दगा दिल्यामुळे चिचोली, भोंडकी, मोखेटोला येथील शेतकºयांची ३० ते ४० टक्के जमीन पडित राहिली. काही शेतकºयांनी पाण्याची जुडवा जुडव करून धानपिकाची लागवड केली असून स्वत:ला सावरण्याचा शेतकºयानी प्रयत्न केला.
परंतु निसर्गाच्या प्रकोपाने धानपिकाला कापनीच्या हंगामात मावा, तुडतुडा सारख्या किडीने हल्ला चढविला. यात शेतकºयानी सुद्धा प्रतिकार करून नानाविध औषधीची फवारणी करून कीड आटोक्यात आली नाही. धान पिकाची प्रचंड नासधुस झाले यात बहुतांश शेतकºयाचे पिक करपल्यामुळे शेतकºयाचे लाखोचे नुकसान झाले आणि उपजिविकेचे कोणतेही साधन उरले नाही. पिक होईल या आशेने शेतकºयांनी दिवस रात्र एक करून शेतीत राबला परंतु शेवटी निराशा मिळाली. कर्जबाजारीपणाला समोर जावे लागले. शेतकºयाला लागवडीपासून मळणीपर्यंत एकरी १५ ते १६ हजार खर्च येतो.
शेतकरी कुटून ना कुठून कर्ज काढून शेतीला कमी करत नाही व पिक हातात आल्यानंतर कर्जाची परतफेड करतो. परंतु धानपिक नष्ट झाल्यामुळे शेतकºयांना असाह्य वेदना सुरू झाल्या की पुढे कसे जीवन जगावे, कर्जाचे परतफेड करायेच कसे या विचारात शेतकरी चिंताग्रस्त दिसत असून शासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहेत. या शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
चिचोली साझा येथील तलाठी के.के. गोस्वामी, कोटवार भगवान नेवारे यांनी शेतकºयांच्या धानपिकाची सोमवारला पाहणी करून सरपंच अनिता नेवारे, कृष्णकुमार रहांगडाले, वनिता डोंगरे, रतनलाल पारधी, मोरेश्वर ठाकरे, टेंभरे यांच्या उपस्थितीत पंचनामे केले.