पांडे महाल विक्रीचे षडयंत्र
By admin | Published: May 16, 2017 12:20 AM2017-05-16T00:20:50+5:302017-05-16T00:20:50+5:30
शहरातील पुरातण वास्तु असलेला पांडे महाल भंडारा शहरच नव्हे तर विदर्भात ख्यातीप्राप्त आहे.
धनाढ्यांची नजर : शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील पुरातण वास्तु असलेला पांडे महाल भंडारा शहरच नव्हे तर विदर्भात ख्यातीप्राप्त आहे. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी हा महाल विक्रीचा कट काही व्यवसायिकांनी रचला होता. त्यावेळी शिवसेनेसह सामाजिक संघटनांनी आंदोलने करून हा कट हाणून पाडला होता. परंतु आता हा महाल विकण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत विकला जावू नये, यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
तत्कालीन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यावेळी प्रशासनाने या महालाचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करवून पांडे महाल पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानंतर पुरातण वास्तु घोषित केले होते. त्यानंतर आता ५ वर्षांनी हा महाल पुरातण वास्तु नाही, असा आदेश पुरातत्व विभागाकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे हा महाल खरेदी-विक्रीचा अडथळा मागील दाराने हटविण्यात आले. आता पांडे महाल खरेदी-विक्रीचे षडयंत्र थांबविण्याची मागणी होत आहे. महाल विक्री होणे तातडीने थांबवून सदर महालाचे जतन व्हावे, या महालाचा गौरव आणि नागरिकांच्या भावनांचा आदर कायम ठेवावा. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा उपसभापती ललित बोंदे्र मुकेश थोटे, सुरेश धुर्वे, रोशन कळंबे, यशवंत वंजारी, सुमित मेश्राम, प्रणय बंसोड, श्यामराव सेलोकर, यशवंत सोनकुसरे, अनिल गायधेन, संजय रेहपाडे, शुभम बारापात्रे, संदीप सार्वे यांनी दिला आहे.