शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची संकल्पना राबविली कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:09 AM2019-08-08T01:09:01+5:302019-08-08T01:09:25+5:30
भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१४ पासून रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागात राबविण्यावर भर दिला आहे. मात्र कागदी घोड्यात मंजूर करून प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच होत असल्याचे चित्र आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१४ पासून रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागात राबविण्यावर भर दिला आहे. मात्र कागदी घोड्यात मंजूर करून प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच होत असल्याचे चित्र आहे. भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले असले तरी या संकल्पनेला समृद्ध रुप आलेले नाही.
एकट्या भंडारा जिल्ह्यातील मागील सहा वर्षात ५०१ इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात किती जणांनी जलपुनर्भरण कार्यक्रमांर्गत इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना कार्यरत केली. याबाबत संभ्रमता आहे. भंडारा नगरपरिषद कार्यालय, नगर रचना विभाग यांच्या मार्फत बांधकाम करण्याबाबतची परवानगी दिली जाते. मात्र पालिकेमध्ये मनुष्यबळाचा अभाव, वाढलेली कामाची व्याप्ती व अन्य कारणांमुळे परवानगी दिलेल्या किती इमारत बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना २० टक्केच राबविण्यात आल्याचे समजते. नागरिक याबाबत अनुत्सुक दिसतात. सदर संकल्पना राबविण्याची जबाबदारी जितकी पालिकेची आहे तितकीच सामाजिक जबाबदारीही नागरिकांची असल्याचे बोलले जाते.
नागरिकांचे सहकार्य आवश्यक
भंडारा शहरात पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच घर बांधकाम करतेवेळी परवानगी दिली जाते. त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अत्यंत गरजेचे व आवश्यक बाब म्हणून नमूद केली आहे. माझ्याकडे बांधकाम विभागाचा कार्यभार असल्यामुळे भंडारा शहरातील नवनिर्माणाधिन इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग होत आहे की नाही याची माहिती घेण्याचे कार्य मी सातत्याने करीत असतो. यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष नगरपालिका, भंडारा
ही सामूहिक जबाबदारी
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जल, जंगल, जमीन, जानवर आदींचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. यात पाणी ही अत्यंत महत्वाची बाब असून पावसाचे पाणी वाहून न जाता त्याचे जतन करणे महत्वाचे आहे. पालिकेच्या निर्देशानंतरही बऱ्याच ठिकाणी इमारत बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पनेला तडा दिला जातो. ही खरच गंभीर बाब आहे. याबाबत वेळीच दखल घेणे गरजेची बाब आहे. एकंदरीत ही संकल्पना राबविणे सामूहिक जबाबदारीचे कार्य आहे.
-मो.सईद शेख, अध्यक्ष, ग्रीन हेरिटेज सामाजिक संस्था, भंडारा.
असे केले जाते जल पुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी
जल पुनर्भरणाचे हे आहेत फायदे
पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.
गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. जलसंधारणाच्या बºयाच पद्धती या घरबांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी अतिशय
निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.
विद्यमान स्थितीत पुनर्भरण करण्यासाठी हजार ते १२०० रुपयापर्यंतचा खर्च करून ही संकल्पना कार्यान्वित करण्यात येत असते. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही होत असल्याचे दिसून येते.