पालकांनी शिक्षणात गुंतवणूक करावी
By admin | Published: August 18, 2016 12:21 AM2016-08-18T00:21:50+5:302016-08-18T00:21:50+5:30
स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्याकरिता दर्जेदार शिक्षणाची गरज आहे.
८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
तुमसर : स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्याकरिता दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. प्रत्येक पालकांनी काटकसर करून शिक्षणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. संताजी सभागृहात आयोजित तेली समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आमदार चरण वाघमारे, तेली समाजाचे केंद्रीय कार्याध्यक्ष कमलाकर घाटोळे, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष अरविंंद कारेमोरे, डॉ. पवन तिबुडे, विक्रीकर अधिकारी भारती पाटील, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, डॉ. पंकज कारेमोरे, प्रदीप पडोळे, सुधाकर कारेमोरे, कल्याणी भुरे, कुंदा वैद्य, सीमा भुरे, कविता साखरवाडे, राजेश देशमुख, अॅड. दिलीप तिमांडे उपस्थित होते. ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह तथा संताजीच्या विचारांचे पुस्तक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिथींनी मार्गदर्शन केले. संतोष खोब्रागडे, नामदेव हटवार यांनी कॅरीअरबद्दल माहिती दिली. संचालन व प्रास्ताविक युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष अनिल कारेमोरे तर आभार शैलेश पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक अरुण मोखारे, अजय हटवारसह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल साठवणे, विजय लांजेवार, अमित कुंजेकर, गणेश पाहुणे, पवन पाटील, किशोर हटवार, जवाहर कुंभलकर, प्रमोद चिंधालोरे, निलेश कापसे, जितेंद्र बावनकर, सुनिल थोटे, मनिष धुर्वे, नरेश भुरे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)