पितृछत्र हरपलेल्या त्या विद्यार्थ्यांचे स्वीकारणार पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:14+5:302021-06-29T04:24:14+5:30
भंडारा : कोरोनाने भंडारा व पवनी तालुक्यातील अनेक नागरिकांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे त्यांचा परिवार संकटात सापडला आहे. कोरोनामुळे ...
भंडारा : कोरोनाने भंडारा व पवनी तालुक्यातील अनेक नागरिकांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे त्यांचा परिवार संकटात सापडला आहे. कोरोनामुळे पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून त्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
धारगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण व आशांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. तत्पुर्वी रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात असलेल्या आशाताईंना छत्री, डायरी व पेन देण्यात आले. आशाताईंचे कार्य प्रशंसनीय असून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. यावेळी धारगावचे सरपंच संतोष पडोळे, उपसरपंच अश्वीन नंदेश्वर, दीपक वंजारी, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे, डाॅ.सहारे, डाॅ.कैकाडे, नंदू रणदिवे, खुटसावरीचे सरपंच मनिषा वासनिक, संदीप खंडाते, ज्योती नंदेश्वर, खुर्शीपारचे सरपंच अंजली वासनिक, शेषराव शेंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आशा वर्कर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.