पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:35 PM2018-07-04T22:35:40+5:302018-07-04T22:36:12+5:30
प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.
दुकाने, बँक, ग्रामपंचायत कार्यालय, प्रवासी निवारा, मुख्य व्यापारी लाईन किंवा विविध महत्वाच्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसीन येते. अड्याळ येथेही अशीच स्थिती आहे. दुचाकीसह चारचाकी वाहन धारकाला नेहमी एकच प्रश्न पडतो तो म्हणजे वाहन ठेवायचे तरी कुठे? मग मिळेल त्या ठिकाणी वाहन उभे ठेवले जाते? परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होतो. यात ग्रामस्थांना, पादचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना याचा रोजच त्रास सहन करावा लागतो. याची कल्पना सुद्धा संबंधित प्रशासन तसेच विभागाला आहे का, असा सवाल मात्र आज ग्रामस्थ ठिकठिकाणी करताना दिसत आहे.
अड्याळ गावात पोलीस ठाणे आहे तसेच तालुक्यातील सर्वात मोठी व उप तालुक्याचा नावाचा दर्जा प्राप्त असलेली १९ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यालय आहे. या इमारतीला लागूनच प्रवासी निवारा परिसर आहे. यामध्ये नेहमीकरिता एक वाहतूक नियंत्रक राहिल म्हणून मागील काळात ठरले होते, परंतु शोकांतिका अशी की काही दिवस सुरळीत चालले, त्यात सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आली व त्यानंतर मात्र याविषयी कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान देणे टाळले. आमि समस्या वाढतच गेली.
गुजरी चौकामधील बँकमध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने खातेधारक येतात. यात त्यांना गर्दीचा तसेच शौचालय व वाहन पार्किंगच्या समस्येचा सामना गेली अनेक वर्षापासून होत असतानाही मात्र याकडे लोकप्रतिनिधी नेहमीच दुर्लक्ष करतात.
गावातील प्रवासी निवारा परिसरातील अनधिकृत पार्किंग होण्यामागे जबाबदार कोण, असा प्रश्न मात्र आज ग्रामस्थांना पडला आहे. एखादी अती महत्वाच्या, तात्काळ सेवेचा लाभ मिळणेकरिता गावातील मुख्य मार्गावरून जायचे झाल्यास अनेक ग्रामस्थांना त्याचा भयंकर त्रास होतो तशीच काहीशी स्थिती बसप्रवासी निवारा परिसरातील नेहमीच पाहायला मिळते. येथील दुकानदारांच्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयातही तीच स्थिती आहे.
वाहनधारक तसेच चालकांनी वाहन ‘पार्क’ तरी कुठे करायचे. यावर ग्रामपंचायत की पोलीस प्रशासन एकमेंकावर जबाबदारीचे खापर फोडीत असतात. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आहे. सरपंच जयश्री कुंभलकर यांच्या मते यासाठी येथील व्यवसायीकांनी व वाहतूक नियंत्रक, पोलीस कर्मचारी यांनी गावहितासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.