राष्टÑीय महिला परिषदेत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:26 PM2017-08-21T22:26:42+5:302017-08-21T22:27:00+5:30
० जुलै १९४२ ला अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : २० जुलै १९४२ ला अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्या परिषदेत देशभरातील २५ हजार महिला व ५० हजार पुरुष एकूण असा ७५ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील समस्त महिला वर्गाच्या हक्कासाठी व उत्थानासाठी अहोरात्र झटले व शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मुलमंत्र देऊन समाजाला जागृत केले. आयुष्यभर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढा देणारे क्रांतीकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क महिलांना प्राप्त करुन दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा क्रांतीकारक व परिवर्तनशील इतिहास लक्षात घेता १९४२ च्या महिला परिषदेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे औचित्य साधुन एक अमृत महोत्सवी राष्टÑीय महिला परिषद २२, २३ व २४ आॅक्टोबर २०१७ रोजी नागपूरच्या दिक्षाभूमीवर आयोजित केली आहे. या परिषदेत बहुसंख्येने सहभागी व्हा, असे आवाहन लॉर्ड बुध्दा टीव्हीचे भैय्याजी खैरकर यांनी साकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित तालुकास्तरीय चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून महिला व बालकल्याण सभापती रोहिणी मुंगूलमारे, माजी सभापती रेखा भाजीपाले, संभागार फाउंडेशनचे अध्यक्ष एम. एस. जांभुळे, राष्ट्रीय धम्मप्रचारिका पूष्पा बौध्द, राष्ट्रीय महिला महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, वंदना वनकर, प्रा. माधुरी गायधनी, नालंदा टेंभुर्णे, गीता बडोले, प्रिया शहारे, राजेश बौध्द, डी. जी. रंगारी, रिना बौध्द आदी उपस्थित होते. एम.एस. जांभुळे, सी. एन. हातमोडे, प्रा. माधुरी गायधने, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सुषमा भड, रेखा भाजीपाले, रोहिणी मुंगूलमारे, पुष्पा बौध्द, प्रिया शहारे यांनी महिलांच्या समस्या व त्यावर उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. आयोजन डी. जी. रंगारी यांनी केले. संचालन कल्पना सांगोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. ज्योती कान्हेकर व आभार चंदा कांबळे यांनी मानले. तर आभार माया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कल्पना सांगोडे, भारती रंगारी, चंदा कांबळे, सविता शहारे, कौशल्य नंदेश्वर, शिलादेवी वासनिक, कल्पना मेश्राम, प्रिती डोंगरवार, शामला बन्सोड, हिरा बडोले, सुशिला मेश्राम, संदेशा मेश्राम व सर्व महिलांनी सहकार्य केले.