प्रगत शैक्षणिक उपक्रमात १५ माध्यमिक शाळांचा सहभाग
By admin | Published: July 8, 2016 12:34 AM2016-07-08T00:34:22+5:302016-07-08T00:34:22+5:30
माध्यमिक शिक्षणातील गुणवत्ता वाढ व गळतीचे प्रमाण कमी करणे हा एक शिक्षणातील महत्वपूर्ण बाब आहे.
गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार : विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यावर भर
इंद्रपाल कटकवार भंडारा
माध्यमिक शिक्षणातील गुणवत्ता वाढ व गळतीचे प्रमाण कमी करणे हा एक शिक्षणातील महत्वपूर्ण बाब आहे. यावर तोडगा काढण्याचा दृष्टीकोनातून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यात भंडारा जिलञह्यातील १५ माध्यमिक शाळ)ंची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मागील महिन्यात याविषयी प्रधान सचिवांनी स्पष्ट निर्देश दिले होते.
माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या बाबीवर स्वरूप निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) प्राचार्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
यात माध्यमिक शिक्षणातील ‘केआरए’ अद्ययावत व त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्याचे निेर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांचा सहभाग यात करून घ्यायचा आहे. निवड करण्यात आलेल्या माध्यमिक शाळेत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात इयत्ता ९ वी व दहावीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, गणित, इंग्रजी विषयाच्या प्रगती चाचणी घेणे, विद्यार्थ्यांची क्षमता संपादणुकीसाठी कृती कार्यक्रम आखणे, नेतृत्त्व विकास प्रशिक्षण व पर्यवेक्षणीय यंत्रणेला प्रशिक्षण देणे, परिक्षेबाबतची भिती दूर करणे, पाठ्यक्रमावर आधारीत प्रश्नांना उत्तर देण्याची क्षमता निर्माण करणे, आदी बाबींचा समावेश आहे.
यात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग या उपक्रमाचा खऱ्या अर्थाने आधार मानला जात आहे.
काय आहे उद्दिष्ट
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने १० ते १५ माध्यमिक शाळांची निवड करावी. शाळांना भेट द्यावी. शाळा बाह्य मुले विरहीत तालुका घोषित करण्यासाठी प्रयत्न करावे, चार विद्यार्थ्यांमागे एक ‘टॅबलेट’ असावे, गणित अध्यापनाच्या चांगल्या पद्धती शोधाव्यात, असे लक्ष्य जिल्हा शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
या माध्यमिक शाळांचा सहभाग
या उपक्रमांतर्गत सुबोध विद्यालय मासळ (ता.लाखांदूर), विद्या विहार मंदिर लाखांदूर, राधेय विद्यालय पिंपळगाव (ता. लाखांदूर), जिल्हा परिषद हायस्कूल आसगाव (ता.पवनी), नुतन कन्या शाळा भंडारा, जेसीस कॉन्व्हेंट भंडारा, जकातदार विद्यालय भंडारा, लाल बहादुर शास्त्री विद्यालय भंडारा, महिला समाज हायस्कूल भंडारा, जिजामाता हायस्कूल भंडारा, जिल्हा परिषद हायस्कूल वरठी (ता.मोहाडी), जिल्हा परिषद हायस्कूल साकोली, शारदा विद्यालय तुमसर, जनता विद्यालय तुमसर आणि सेंट जॉन मिशन स्कूल तुमसर या शाळांचा समावेश आहे