पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:31 PM2018-03-26T23:31:51+5:302018-03-26T23:31:51+5:30
पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
देवरी : पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानांतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि.२४) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सरपंच विद्या खोटेले होत्या. या वेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संजय गायगवळी, जि.प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शहारे, जि.प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी हिरूळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जानकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत अनेक योजना आहेत. त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांनी लाभ घ्यावा. गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाने जोडधंदा म्हणून माशांची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकºयाचा मुलगा उद्योगपती कसा बनेल, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही. पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील, यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई-म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गिक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनांची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकºयांनी एफएमडीसीपी अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. शहारे म्हणाले, जिल्ह्यातील संकलित दुधाकरिता मार्केटिंगची आवश्यकता आहे. या लसीकरण अभियानाचा सर्व गोपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून डॉ. वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे, असे सांगितले.