कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:59+5:302021-08-12T04:39:59+5:30

कधी या पक्षातून तर कधी दुसऱ्या पक्षातून अन्य पक्षांत उडी घेणे राजकारणात काही नवीन बाब नाही. मात्र, स्थानिक राजकारणात ...

Party affiliation of activists | कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Next

कधी या पक्षातून तर कधी दुसऱ्या पक्षातून अन्य पक्षांत उडी घेणे राजकारणात काही नवीन बाब नाही. मात्र, स्थानिक राजकारणात प्रतिबिंब उमटविणारे खरे कार्यकर्ते एका पक्षावर नाराजी व्यक्त करून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा हा प्रकार त्या पक्षासाठी धक्कादायकच असतो. रविवारचा दिवसही असाच पक्ष कार्यकर्त्यांसाठी खास ठरला. भाजपमधून काँग्रेसमध्ये शिरकाव करताना आपली नाराजी व्यक्त केली. नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भंडारा शहरातील दोन कार्यकर्त्यांनी हा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरसेवक असलेले नितीन धकाते व भाजपचे महामंत्री असलेल्या संजय चौधरी यांच्या कॉंग्रेस पक्ष प्रवेशाने शहरात चर्चेला उधाण आले. यातून राजकीय समीकरणेही बदलतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही परिवर्तनाची नांदी तर नाही ना अशी चर्चाही रंगली आहे.

Web Title: Party affiliation of activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.