दीड वर्षापासून पॅसेंजर बंद; प्रवाशांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:52+5:302021-09-02T05:15:52+5:30
पॅसेंजर बंद असल्याने दीड वर्षापासून सामसूम आहे. गाड्याच थांबत नसल्याने रेल्वेस्थानक सुरू असले तरी बंद असल्याच्या स्थितीत आहे. विशेष ...
पॅसेंजर बंद असल्याने दीड वर्षापासून सामसूम आहे. गाड्याच थांबत नसल्याने रेल्वेस्थानक सुरू असले तरी बंद असल्याच्या स्थितीत आहे. विशेष गाड्या या मुख्य रेल्वेस्थानकावर थांबत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. भंडारा ते गोंदिया या रेल्वेमार्गावर फक्त कोका हे एकमेव पॅसेंजर गाडी थांबण्याचे स्थानक आहे. येथे फक्त एक पॅसेंजर गाडी थांबत आहे.
बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या
सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यातील वरठी, कोका, तुमसर जंक्शन या रेल्वेस्थानकातून फक्त एक पॅसेंजर गाडी धावत आहे. उर्वरित तीन पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
फक्त एका पॅसेंजरचा थांबा
भंडारा जिल्ह्यातील गेलेल्या रेल्वेच्या जाळ्यांतर्गत कोका रेल्वेस्थानकावर फक्त दुर्ग-इतवारी ही पॅसेंजर थांबत असते.
एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?
रेल्वे विभागाने मागील सहा महिन्यापासून विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. त्याच्या तिकिटाचे दरसुद्धा अधिक आहेत. या गाड्यांमध्ये गर्दी वाढत आहे. मात्र यानंतरही पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाही. पॅसेंजर गाड्यांमुळेच कोरोना होताेय काय, असे वाटू लागले आहे.
- रमेश तईकर, प्रवासी,
दीड वर्षापासून पॅसेंजर आणि लोकल बंद असल्याने गोरगरीब प्रवाशांना सर्वाधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वेमुळे वेळ आणि पैशाचीदेखील बचत होत होती. शिवाय या गाड्यांमुळे अनेकांचा रोजगारदेखील चालत होता. तोसुद्धा आता बुडाला आहे. रेल्वे पॅसेंजर आणि लोकल गाड्या त्वरित सुरू करण्याची गरज आहे.
- संतोष साखरे, प्रवासी