मुंबई-हावडा मार्गावर प्रवासी रेल्वे धावतात रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:08+5:302021-06-10T04:24:08+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यासह लोकल प्रवासी गाड्या काही काळासाठी बंद केल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरू ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यासह लोकल प्रवासी गाड्या काही काळासाठी बंद केल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. एक्सप्रेस गाड्यात केवळ आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तर दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची संख्या मात्र वाढली नाही. अशीच स्थिती एक्सप्रेस गाड्यात दिसून येते.
सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाने लांब अंतराच्या एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या होत्या. यात आरक्षणासह प्रवास करण्याच्या आदेश दिले होते. परंतु आरक्षण डब्यातही प्रवाशांची संख्या निम्म्यावर दिसून येते. दुसऱ्या टप्प्यात रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या सुरू केल्या. परंतु यामध्येही प्रवाशांची संख्या अत्यल्प दिसून येत आहे. कोरोनाची धास्ती रेल्वे प्रवाशांनी घेतल्याचे दिसून येते.
सर्वसामान्य प्रवासी येथे चारचाकी वाहनाने प्रवास करताना दिसतात. जवळच्या प्रवासासाठी दुचाकीचा वापर वाढलेला दिसून येत आहे. बसकडेही प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवासाकरिता नियम ठरवून दिले आहेत. सर्वसामान्यांना रेल्वेस्थानकावर अजूनही प्रवेशबंदी आहे. कोरोना संक्रमण काळात नागरिकांनी बाहेरगावी जाण्याचे टाळल्याचे दिसून येते.