कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:58 PM2017-10-17T23:58:52+5:302017-10-17T23:59:10+5:30
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमिवर ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहे. सणा सुदीच्या काळात कोट्यवधींचा महसूल परिवहन मंडळातर्फे राज्य शासनाला मिळत असताना संपामुळेही हा महसूल बुडत आहे.
भंडारा व गोंदिया जिल्हा मिळून एकूण सहा आगार आहेत. त्यापैकी चार आगार एकट्या भंडारा जिल्ह्यात आहे. तुमसर, भंडारा, पवनी व साकोली आगाराचा समावेश आहे. भंडारा विभागातून विविध मागण्यांच्या संदर्भात ४०८ पैकी ४०० कर्मचाºयांनी संपात सहभाग नोंदविला आहे. परिणामी भंडारा आगारातून सोडल्या जाणाºया ७४९ बसफेºया रद्द झाल्या. कर्मचाºयांचा हा संप बेमुदत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने सर्वच आगारातील बसफेºया मुख्यालयी येवू न शकल्याने प्रवाशांना खाजगी वाहन सेवेचा उपयोग करावा लागला. एकंदरीत दिवाळीच्या तोंडावर स्वगावी परतणाºया व अपडाऊन करणाºया कर्मचाºयांना चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. शाळेला दिवाळीची सुटी लागल्याने विद्यार्थी वर्गाला त्रासापासून सुटका मिळाली. या संपामुळे बसस्थानक निर्मनुष्य झाले होते. संप असल्यामुळे प्रवाशीही बसस्थानकाकडे फिरकले नाही. दुसरीकडे या संपामुळे लाखोंचा महसूल बुडाला आहे. मागण्यांमध्ये एस.टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाºयांप्रमाणे होण्यासाठी सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणींसह सातवा वेतन आयोग लागू करावा, १ जुलै २०१६ पासून देय होणारा सात टक्के महागाई भत्ता व जानेवारी २०१७ पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करावा, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, १ एप्रिल २०१६ पासून हंगामी वाढ लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला ५०० रूपये याप्रमाणे वर्षभर मोफत पास देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना व कृती समितीचा सहभाग असून या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना व संघर्ष ग्रृपने पाठींबा दर्शविला आहे.
मागण्या मंजूर करा
साकोली : एस.टी. कर्मचाºयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला खा. नाना पटोले यांनी आपला पाठिंबा दर्शविला अून जनतेनेही या संपाला आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केला आहे. आज ते साकोली येथील बसस्थानक एसटी कर्मचाºयांच्या मंडपाला भेट दिली. संघटनेच्या पदाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कर्मचाºयांच्या अडचणीसंबंधी चर्चा केली. एसटी महामंडळ हा सध्या तोट्यात नसून नफ्यात आले व हा नफा स्वच्छता अभियानाच्या नावावर खर्च होत आहे. यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी पैसा खर्च करण्यात येत आहे. याची चौकशी करण्यात यावी. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एस.टी. कर्मचाºयांचे पगार कमी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यास अडचण येत आहे. राज्य शासनाने एस.टी. ला टोलमुक्त करावे तसेच कर्मचाºयांचे वेतन वाढवावे, अशी माहितीही यावेळी नाना पटोले यांनी केली आहे. एस.टी. महामंडळात जुने टायर रीमोल्डीग करून वापरतात व नवीन टायर खरेदीचे बिल जोडण्यात येतात. तसेच डिझल हे बाहेरून भरले जातात याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खा. पटोले यांनी यावेळी केली.
१४९ कर्मचारी सहभागी
पवनी : एस.टी. आगार व बसस्थानकात कार्यरत १५३ कर्मचारी आहेत त्यापैकी १४९ कर्मचारी संपात सहभागी आहेत. संप करू यासाठी शासन व महामंडळ स्तरावरून प्रयत्न झाले परंतू संपात सहभागी कर्मचारी कार्यवाहीची तमा न बाळगता संपावर राहिले त्यामुळे एस.टी. बस आगारात बसगाड्या रात्री १२ वाजतापासून उभ्या करण्यात आलेल्या होत्या.
तुमसर आगारातही संप
तुमसर : तुमसर आगारातून २५ बसफेºया सुटतात. परंतु संपामुळे दिवसाकाठी होणारा महसूलही बुडाला. अन्य राज्य सरकारांनी त्यांच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना ग्रेड पे सह वेतन दिले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्यातच महामंडळाच्या कर्मचाºयांना कमी वेतनावर काम जास्त व टेंशन अधिक दिले जात आहे.
भंडारा विभागातून दिवसाकाठी जवळपास ७५० बसेस सुटतात. संपामुळे या सर्व बसफेºया रद्द झाल्या आहेत.
-फाल्गून राखडे, आगार व्यवस्थापक भंडारा.