रेल्वे स्थानकात प्रवाशांची एंट्री विरुद्ध दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:07 PM2019-06-30T22:07:20+5:302019-06-30T22:07:37+5:30
नागपूर- गोंदिया प्रवासा दरम्यान रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसून येते. रेल्वे गाडीत लवकर चढण्याकरिता शेकडो रेल्वे प्रवाशी स्थानकाच्या विरुध्द बाजूने जीव धोक्यात घालून प्रवाशी गाडीत प्रवेश करतात. सदर मार्गावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवाशांना गाडीत प्रवेश करतांना तारेवरची कसरत करावी लागते. नेहमीच्या गर्दीचा सर्वात जास्त फटका प्रवाशी महिला, वृध्द तथा लहान मुलांना बसत आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर शटल ट्रेन सुरु करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नागपूर- गोंदिया प्रवासा दरम्यान रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसून येते. रेल्वे गाडीत लवकर चढण्याकरिता शेकडो रेल्वे प्रवाशी स्थानकाच्या विरुध्द बाजूने जीव धोक्यात घालून प्रवाशी गाडीत प्रवेश करतात. सदर मार्गावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवाशांना गाडीत प्रवेश करतांना तारेवरची कसरत करावी लागते. नेहमीच्या गर्दीचा सर्वात जास्त फटका प्रवाशी महिला, वृध्द तथा लहान मुलांना बसत आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर शटल ट्रेन सुरु करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.
नागपूर, भंडारा, तुमसर, तिरोडा व गोंदिया दरम्यान दररोज शेकडो प्रवाशी ये-जा करतात. या मार्गावर प्रत्येक पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल राहत असल्याने प्रवाशांचे गेल्या अनेक दिवसापासून हाल होत आहेत. प्रवाशांना रेल्वेस्थानकावरुन सहजपणे गाडीत प्रवेश करता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशी विरुध्द बाजूने रेल्वेगाडीत प्रवेश करताना धडपड करतात. परंतु यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून नाईलाजने शेकडो प्रवाशी असे विरुद्ध दिशेने रेल्वेस्थानकात प्रवास करताना दिसतात.
सकाळी व सायंकाळच्या वेळी या मार्गावर हजारो प्रवाशांची दैनंदिन ये जा सुरु असते. प्रवाश्यांच्या तुलनेत मार्गावर गाड्या त्या मानाने कमी आहेत. शेकडो प्रवाशांना दररोज उभ्यानेच प्रवास करावा लागतो. रेल्वे स्थानकातील गाडीत प्रवेश करणे प्रवाशांना मोठे आव्हान आहे. त्यातच महिला, वृध्द व लहान मुलांना प्रवेश करणे अत्यंत कठीण होत आहे.सदर मार्गावर रेल्वे प्रशासनाने प्रवाशी गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
तुमसर- तिरोडी रेल्वे इतवारीपर्यंत जाते तशीच ती गाडी गोंदिया पर्यंत वाढविण्याची गरज बनली आहे. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून १ जुलैपासून अनेक प्रवाशी गाड्या उशिरा सुटणार असल्याचे पत्रकच दक्षीण पूर्व रेल्वेने काढले आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रवाशी गाड्या वाढविणे, शटल ट्रेन सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. याकडे रेल्वे प्रशसनाने गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.