पॅचेस झालेला रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:31 AM2020-02-20T01:31:30+5:302020-02-20T01:32:06+5:30

पालोरा ते खडकी या दोन-तीन किलोमीटर लांबीच्या डांबर रस्त्याची पार ऐसीतैसी झाली आहे. खोलखड्डे व आडव्या नाल्यांचे साम्राज्य आहे. खड्डी रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर पसरल्याने वाहनांचे अपघात वाढीस लागले आहे. खोल खड्डे वाहतुकदारांशी यमदूत ठरू पाहत आहेत. रस्त्याचे दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्यावतीने हाती घेण्यात आले.

The patched road collapsed | पॅचेस झालेला रस्ता उखडला

पॅचेस झालेला रस्ता उखडला

Next
ठळक मुद्देपालोरा-खडकी रस्ता : चौकशी करुन दुरूस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : अनेक वर्षांपासून दुर्लक्षित पालोरा ते खडकी डांबरीकरण रस्त्यावर दोन महिन्यापुर्वी पॅचेसचे काम करण्यात आले. कंत्राटदाराने रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे बुजविले. मात्र, तुलनेत लहान खड्डे अधिक लाभासाठी बुजविण्यात आले नाही. परिणामी आज लहान खड्डे मोठे होवून वाहतुकदारांशी जीवघेणे ठरू पाहत आहेत. प्रकरणी चौकशी करून पुन्हा दुरूस्तीचे काम करण्याची मागणी होत आहे.
पालोरा ते खडकी या दोन-तीन किलोमीटर लांबीच्या डांबर रस्त्याची पार ऐसीतैसी झाली आहे. खोलखड्डे व आडव्या नाल्यांचे साम्राज्य आहे. खड्डी रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर पसरल्याने वाहनांचे अपघात वाढीस लागले आहे. खोल खड्डे वाहतुकदारांशी यमदूत ठरू पाहत आहेत. रस्त्याचे दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्यावतीने हाती घेण्यात आले. दोन महिन्यापूर्वी तुमसर येथील कंत्राटदारांकडून दुरूस्तीचे काम करवून घेण्यात आले. मात्र, दुरूस्तीचे कामात गैरप्रकार करण्यात आला. कंत्राटदाराने मोठ्या खड्डे दुरूस्तीचे काम करून लहान खड्डे जशेच्या तसे ठेवले. नागरिकांनी कंत्राटदारास लहान खड्डे बुजविण्यास सांगितले असता, पुन्हा रस्ता उखडले तेव्हा करू बघू, असे उत्तरे देवून आपले काम पूर्ण करण्याचा बहाना केला. आज त्या रस्त्याची अवदशा झाली आहे.

Web Title: The patched road collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.