मानवधर्माच्या शिकवणीतून प्रगतीचा मार्ग

By admin | Published: April 8, 2016 12:35 AM2016-04-08T00:35:03+5:302016-04-08T00:35:03+5:30

मानवाच्या जीवनात सुधारण्यासाठी अनेक ग्रंथ संपदांची निर्मिती झाली. यात विचारांची प्रेरणा मिळाली.

The path of progress through the teachings of humanism | मानवधर्माच्या शिकवणीतून प्रगतीचा मार्ग

मानवधर्माच्या शिकवणीतून प्रगतीचा मार्ग

Next

ढबाले यांचे प्रतिपादन : सोनेगावात सेवक संमेलनाचे आयोजन
चुल्हाड (सिहोरा) : मानवाच्या जीवनात सुधारण्यासाठी अनेक ग्रंथ संपदांची निर्मिती झाली. यात विचारांची प्रेरणा मिळाली. बाबा जुमदेवजी यांनी आयुष्यात याच विचारांचा प्रसार व प्रचार केला. मानवधर्माच्या शिकवणुकीतून प्रगतीचा मार्ग प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन यशवंत ढबाले यांनी केले.
सोनेगाव येथे बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने सेवक संमेलनाचे आयोजनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन लता बुरडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र ुतुरकर यांचे अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मिरा तुरकर, प्रभूदास पडोळे, जयराम पडारे, तंमुसचे अध्यक्ष अविनाश कोंडेवार, उमेश फुंडे, मोरेश्वर सार्वे, नरेश सव्वालाखे, राजू पिलारे, कंठीराम पडारे, नत्थू कोहडे, एकनाथ जिभकाटे, गुरुदास शेंडे, राजू माटे, रवी मरसकोल्हे, सरस्वता माटे, हिरालाल उपरीकार, सूरज शरणागत, गोविंद सेलोकर, मिरा शेंडे, अरुण रहांगडाले उपस्थित होते. या सेवक संमेलन निमित्त गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आला असून सूरज शरणागत यांचे घरी हवन कार्यक्रम पार पडले. सेवकांनी दांडीया नृत्य सादर केले. तर शोभायात्रा काढण्यात आली. प्रास्ताविक रविंद्र बटारे, संचालन कंठीराम पडारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन योगेश बरोडे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: The path of progress through the teachings of humanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.