आल्यापावली रूग्ण माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:14 AM2017-12-07T00:14:40+5:302017-12-07T00:15:01+5:30

आमगाव येथील आरोग्य उपकेंद्र दोन दिवसापासून कुलूपबंद असून या आरोग्य उपकेंद्रात तपासणीसाठी आलेल्या गरोदर महिला व रूग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे.

The patient returned to the hospital | आल्यापावली रूग्ण माघारी

आल्यापावली रूग्ण माघारी

Next
ठळक मुद्देदोन दिवसापासून रूग्णालय बंद : आमगाव आरोग्य केंद्रातील प्रकार

आॅनलाईन लोकमत
आमगाव (दिघोरी) : आमगाव येथील आरोग्य उपकेंद्र दोन दिवसापासून कुलूपबंद असून या आरोग्य उपकेंद्रात तपासणीसाठी आलेल्या गरोदर महिला व रूग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे.
या आरोग्य उपकेंद्रामध्ये एक आरोग्यसेविका व एक एएनएम कार्यरत आहे. एक आरोग्यसेविका दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये व्यस्त आहे. एक आरोग्यसेविका दोन दिवसापासून सुटीवर आहे. याबाबतची माहिती कुणालाही नाही. येथे कार्यरत महिला शिपायांना सुद्धा आरोग्यसेविका यांनी काहीच माहिती दिली नसल्याने त्या आरोग्य केंद्राच्या बाहेर बसल्या होत्या. येथील कार्यरत आरोग्यसेविका मुख्यालयी राहत नसल्याने गावकºयांना सेवा मिळत नाही. मागील अनेक दिवसापासून आरोग्य सेविकेने घरोघरी जाऊन भेट दिली नाही. याबाबत ग्रामपंचायतचा सार्वजनिक ग्रामसभेमध्ये याविषयी चर्चा होऊन आरोग्य सेविकेने मुख्यालयी राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या ग्रामपंचायतला जुमानत नाही. अलिकडेच या आरोग्य उपकेंद्राची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात आली. मात्र गावकºयांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने याचा उपयोग कुणासाठी असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. रूग्ण परत जाताना पं.स. सदस्य कुंदा वाघाडे, ग्रामपंचायत सदस्य संजय गाढवे यांना ते दिसले. त्यांनी त्या रूग्णांना विचारले असता हा प्रकार लक्षात आला.

आरोग्यसेविकेची दोन दिवसाची ट्रेनिंग आहे. एक आरोग्यसेविका दोन दिवसाच्या सुटीवर आहे. त्यामुळे उपकेंद्र बंद असावा.
- डॉ.पी.डी. शहारे,
वैद्यकीय अधीक्षक, धारगाव

Web Title: The patient returned to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.