पवनी- कऱ्हांडला अभयारण्य ठरत आहे पर्यटकांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 05:00 AM2022-02-27T05:00:00+5:302022-02-27T05:00:54+5:30
खापरी गेटमधून पर्यटकांना हमखास प्राण्यांचे दर्शन जंगल सफारीद्वारे होते. येथील घनदाट व ओपन जंगल असल्याने दूरपर्यंतचे प्राणी येथे पाहता येतात. या जंगलात वाघीण आपल्या तीन पिल्ल्यांसह खापरी गेटच्या आजूबाजूच्या परिसरात नेहमी फिरताना दिसते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जंगलामध्ये ठीक ठिकाणी पाण्याचे टाके तयार केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात जंगली प्राण्यांचे नेहमीच पर्यटकांना आकर्षण राहिले आहे. या अरण्यात वाघ, चितळ, अस्वल, हरीण, मोर, रानडुक्कर, नीलगाय, रानगवे असे विविध प्रकारचे जंगली प्राणी मुक्तपणे संचार करीत आहे. पर्यटकांना हमखासपणे या प्राण्यांचे दर्शन होईल असे हे जंगल आहे.
पर्यटकांनी अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर गाईड अनेक जंगली तलावांमध्ये पर्यटकांना घेऊन जात असतात. या तलावात ठाणा, खापरी, बोरी, पानसरा, कोंरभी, पाऊनगाव, राणाई येथील जंगल तलाव विशेष आकर्षण ठरत आहेत. येथे वन्यप्राण्यांचे नेहमी आवागमण होत असते. त्यामुळे पर्यटकांना हमखास त्यांचे दर्शन होत असते.
खापरी गेटमधून पर्यटकांना हमखास प्राण्यांचे दर्शन जंगल सफारीद्वारे होते. येथील घनदाट व ओपन जंगल असल्याने दूरपर्यंतचे प्राणी येथे पाहता येतात. या जंगलात वाघीण आपल्या तीन पिल्ल्यांसह खापरी गेटच्या आजूबाजूच्या परिसरात नेहमी फिरताना दिसते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जंगलामध्ये ठीक ठिकाणी पाण्याचे टाके तयार केले आहेत. सौरऊर्जेवर जंगलामध्ये चालणारे अनेक बोर आहेत. टाक्यांमध्ये पाणी साचल्याने प्राण्यांना दिवसभर पिण्याचे पाणी मिळते. यासाठी पवनी वन विभागाने प्राण्यांची व जंगलाची सुरक्षेसाठी विविध उपाय योजना केल्या आहेत.
पट्टेदार वाघाचे दर्शन
- एक पट्टेदार वाघ येथे आहे. या जंगलात १८ चितळ असून ते देखील पर्यटकांना दर्शन देतात. मोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात लांडोर व मोरांचे थवेच्या थवे पर्यटकांना आकर्षण करीत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हमखास या गेटमधून पर्यटकांनी जंगल सफारी केल्यास त्यांना येथील अनेक जातींचे वृक्ष मोहित करणार आहे. या अरण्यात अनेक जातीचे वृक्ष तसेच राम-लक्ष्मण दोन मोठे सागवान झाड आकर्षणाचे केंद्र आहे.