पवनीत काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:13+5:302021-06-27T04:23:13+5:30
पवनी तालुका कॉंग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस , तालुका एन. एस. यु. आय. व कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या वतीने केंद्र ...
पवनी तालुका कॉंग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस , तालुका एन. एस. यु. आय. व कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या वतीने केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या धोरणांविरुद्ध कॉंग्रेस च्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांचे नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विकास राऊत, राजकपूर राऊत, आॅल इंडिया फिशरमॅन कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रकाश पचारे, महिला प्रदेश च्या सचिव हंसा खोब्रागडे, शालु निलकंठ टेकाम, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, विजय रायपूरकर,शंकरराव मुनारतीवार, धर्मेंद्र नंदरधने, अवनती राऊत, अशोक पारधी, भगवान नवघरे,डॉ.रामचंद्र पाटील, राकेश बिसने,प्रकाश भोगे, मनोज देशमुख, रामभाऊ कुर्झेकर, गजानन भरणे, अनिकेत गभने, महेश नान्हे, चेतन हेडाऊ , अक्षत नंदरधने व कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि संविधान रक्षणाची शपथ घेण्यासाठी सामाजिक न्याय दिनी स्थानिक गांधी चौकात झालेल्या आंदोलनात बोलतांना पदाधिकारी यांनी प्रखरपणे निषेध नोंदविला. आंदोलन सभेचे संचालन महेश नान्हे यांनी तर आभार चेतन हेडाऊ यांनी केले