पवनी शोकमग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:32 AM2017-12-25T00:32:59+5:302017-12-25T00:33:26+5:30

मेजर प्रफुल्ल मोहरकर सीमेवर शहिद झाले. ही बातमी कळताच पवनीकर जनता शोक सागरात बुडाली. व्यापारी संघ, औषधी विक्रेतासंघ व किरकोळ व्यापारी यांनी तातडीची बैठक घेवून त्यांची सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Pavni Sadkhan | पवनी शोकमग्न

पवनी शोकमग्न

Next
ठळक मुद्देएकजूटीचे दर्शन : शहिदाच्या स्मरणार्थ कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : मेजर प्रफुल्ल मोहरकर सीमेवर शहिद झाले. ही बातमी कळताच पवनीकर जनता शोक सागरात बुडाली. व्यापारी संघ, औषधी विक्रेतासंघ व किरकोळ व्यापारी यांनी तातडीची बैठक घेवून त्यांची सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कधी नव्हे ते एकजुटीचे दर्शन पवनी नगरात दिसले.
शहिद प्रफुल्ल मोहरकर यांना श्रध्दांजली व स्मरण करीत पवनीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून कळकळीत बंद पाळला. किराणा कापड, औषधी, चहा-पान, हॉटेल्स, सायकल दुकान सर्व एजन्सीज अशा सर्वांनी सकाळपासून दिवसभर कळकळीत बंद पाळला. महात्मा गांधी चौकात श्रध्दांजली सभेसाठी व्यासपीठ तयार करुन रात्री उशीरापर्यंत शहिदाचे शव सन्मानाने पवनी नगरात येण्याची प्रतिक्षा नागरिक करीत होते. दिवसभर हजारो नागरिकांनी त्यांचे घरी पोहचून आईवडील व नातेवाईकांचे सांत्वन करीत होत? खरा अर्थान रविवारी पवनीकारांनी माणूसकीचा परिचय देत वीर प्रफुल मोहरकर याला आदरांजली अर्पण केली. रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे राहून ‘शहिद प्रफुल अमर रहे’ च्या घोषणांनी नागरिकांनी आसमंत दणाणून सोडला.
 

Web Title: Pavni Sadkhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.