पवनीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:12+5:302021-09-14T04:42:12+5:30
पवनी शहराची लोकसंख्या व ऐतिहासिक दर्जा पाहता, येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी असावा तरच नागरी सुविधा व समस्या तात्काळ सोडविल्या जातील, ...
पवनी शहराची लोकसंख्या व ऐतिहासिक दर्जा पाहता, येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी असावा तरच नागरी सुविधा व समस्या तात्काळ सोडविल्या जातील, अशी मागणी करीत सिटीझन फोरमतर्फे वेळोवेळी निवेदन देऊन पवनीला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात यावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. न.प.ला पूर्णवेळ मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांना भेटून सिटीझन फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी पवनी शहरातील समस्या व उपाययोजना याबद्दल चर्चा केली. सिटीझन फोरमचे वैभव बावनकर, संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, निशांत नंदनवार, देवांग ईखार, पारितोष वंजारी, निखिल शहारे, अनिकेत सिंहगडे, ध्रुव बोटकुले, गौरव बांगरे, कौस्तुभ दिवठे, वृषभ उडकुरकर यावेळी उपस्थित होते.
130921\img-20210913-wa0020.jpg
नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी व सिटीझन फोरमचे पदाधिकारी.