पवनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:31+5:302021-09-02T05:16:31+5:30

आंदोलनाची माहिती होताच प्रभारी मुख्याधिकारी विजय जाधव पालिका कार्यालयात पोहोचले. महाविकास आघाडी पदाधिकारी व नगरसेवकांशी पाणी प्रश्नावर तब्बल दोन ...

Pawani laid a wreath on the empty chair of the chief | पवनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

पवनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

Next

आंदोलनाची माहिती होताच प्रभारी मुख्याधिकारी विजय जाधव पालिका कार्यालयात पोहोचले. महाविकास आघाडी पदाधिकारी व नगरसेवकांशी पाणी प्रश्नावर तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा उपाध्यक्ष विकास राऊत, जिल्हा महासचिव धर्मेंद्र नंदरधने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष यादवराव भोगे, माजी नगराध्यक्ष मुकेश बावनकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सचिव सुनंदा मुंडले, शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ. अनिल धकाते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोहर उरकूडकर, पालिका उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, शिक्षण समिती सभापती शोभना गौरशेट्टिवार, नगरसेवक नरेश तलमले, नगरसेविका वंदना नंदागवळी, नंदा सलामे, माया चौसरे , नगरसेवक राकेश बिसने, माणिकराव ब्राम्हणकर, सुलतान अली, डॉ. रामचंद्र पाटील, विजय रायपूरकर, पुष्पा भुरे, माधुरी तलमले, सतीेश बावनकर, महेश नान्हे, अनिकेत गभणे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठा नियमित होईपर्यंत पालिकेच्या खर्चाने प्रत्येक वाॅर्डात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बॉक्स

कंत्राटदारासह अभियंत्यांना नोटीस

पालिका प्रशासनाने जवाहर गेटजवळ मातीच्या भिंतीवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकामात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. तेव्हापासून पवनीचा पाणीपुरवठा बंद आहे. कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने पाईपलाईन फुटली. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाळे नाही. त्यामुळे कंत्राटदार क्रिष्णा डोरले यांच्या देयकातून दुरुस्तीसाठी लागणारी खर्चाची रक्कम कपात करण्याची नोटीस बजावण्यात आली. पाणीपुरवठा कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी स्थापत्य अभियंता मृणाल हुमने व पाणीपुरवठा अभियंता सूरज पिंपळकर यांना हयगय केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली.

Web Title: Pawani laid a wreath on the empty chair of the chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.