पवनीची साक्षी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:39 PM2018-06-08T23:39:53+5:302018-06-08T23:40:23+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला असून बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनीच यंदा बाजी मारली आहे.

Pawani's witness tops in district | पवनीची साक्षी जिल्ह्यात अव्वल

पवनीची साक्षी जिल्ह्यात अव्वल

Next
ठळक मुद्देदहावीचा निकाल ८६.६४ टक्के : नागपूर विभागात भंडारा दुसऱ्या स्थानावर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला असून बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनीच यंदा बाजी मारली आहे.
पवनी येथील वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिंनी साक्षी सुनिल घावळे ही जिल्ह्यातून पहिली आली. तिला ९९.२० टक्के गुण मिळाले आहेत. भंडारा येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी तोषिता गभने ९७.६२ टक्के घेऊन द्वितीय आली. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा तिसºया क्रमांकावर असताना दहावीच्या निकालात दुसºया स्थानावर राहिला आहे. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर या सातही तालुक्यातून या निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील २८६ शाळेत झालेल्या दहावीच्या परीक्षेत १९ हजार १२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १६ हजार ५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ८ हजार २९४ मुले तर ८ हजार २१४ मुलींचा समावेश आहे. एकूण १९,०५४ विद्यार्थ्यांमधून २,५४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत.
१६ शाळेचा निकाल शंभर टक्के
भंडारा जिल्ह्यातील १६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात आयुध निर्माणी सेंकडरी स्कूल जवाहरनगर, जेसीस इंग्लिश हायस्कूल भंडारा, शंशाक माध्यमिक विद्यालय कवडसी, अंकुर विद्यालय भंडारा, अनुसूचित जाती नवबौद्ध मुलीची शाळा, युनायटेड कॉन्व्हेंट ठाणा (जवाहरनगर), गंगाबाई हायस्कूल चप्राड, बुराडे हायस्कूल डांभेविरली, विद्याविहार मंदिर लाखांदूर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मासळ, लोक विद्यालय पांढराबोडी, पवन पब्लिक स्कूल पवनी, महात्मा गांधी हायस्कूल बाम्पेवाडा, कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल साकोली, इंग्लिश मीडियम हायस्कूल तुमसर, प्रगती केंद्रीय अनूसूचित जाती माध्यमिक निवासी शाळा बपेरा यांचा समावेश आहे. आठ दिवसांपूर्वी जाहिर झालेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला होता. दहावीच्या २८६ आणि बारावीच्या १५४ शाळांच्या तुलनेत शंभर टक्के निकालाच्या शाळांमध्ये बारावीचा निकाल सरस ठरला आहे.
निकालात लाखनी तालुका अव्वल
दहावीच्या निकालात लाखनी तालुक्याचा ८९.८९ टक्के निकाल सर्वाधिक राहिला. लाखनी तालुक्यातील २५ शाळेतून १ हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७९१ मुले आणि ६४० मुली असे १,४३१ विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले. मुलांची टक्केवारी ८७.७९ इतकी असून मुलींची टक्केवारी ९२.६२ इतकी आहे. पवनी तालुक्याचा निकाल ८४.३४ टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्यात सातव्या स्थानावर आहे.
मुलींनीच मारली बाजी
बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलींनी आघाडी घेतली आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ९७९ मुले आणि ९ हजार ७५ मुलींनी परीक्षा दिली. यात ८ हजार २९४ (८३.११ टक्के) मुले ऊत्तीर्ण झाले तर ८ हजार २१४ (९०.५१ टक्के) मुली ऊत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Pawani's witness tops in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.