विना निकष १०० टक्के भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:23+5:302021-05-22T04:33:23+5:30

जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त धान पिकाची शुक्रवारी डाॅ. फुके यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ...

Pay 100% without criteria | विना निकष १०० टक्के भरपाई द्या

विना निकष १०० टक्के भरपाई द्या

Next

जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त धान पिकाची शुक्रवारी डाॅ. फुके यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विनानिकष नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. भंडारा तालुक्यातील डवा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांनी आपबीती सांगितली. अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार फुके यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली. विनानिकष माेबदला देण्याची मागणी केली. काेराेना संकटामुळे शेतकरी डबघाईस आला असून माेठे नुकसान झाले असे सांगत नुकसान णलेल्या धानाची पेंडी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनाेद बांते, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, टेकराम पडाेळे, रंजना माेटघरे आदी उपस्थित हाेते.लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : वादळासह आलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने काेणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार डाॅ. परिणय फुके यांनी केली.

जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त धान पिकाची शुक्रवारी डाॅ. फुके यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विनानिकष नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. भंडारा तालुक्यातील डवा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांनी आपबीती सांगितली. अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार फुके यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली. विनानिकष माेबदला देण्याची मागणी केली. काेराेना संकटामुळे शेतकरी डबघाईस आला असून माेठे नुकसान झाले असे सांगत नुकसान णलेल्या धानाची पेंडी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनाेद बांते, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, टेकराम पडाेळे, रंजना माेटघरे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Pay 100% without criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.