घरकूल लाभार्थ्यांना थकबाकी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:11+5:30
प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुरू झाले. अनेकांनी आपल्या झोपड्या व घरे मोडकळीस काढून भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पंतप्रधान गृहनिर्माण योजना (शहरी) अंतर्गत घरकुल बांधकाम निधीअभावी अडकून पडली आहेत. कोरोना संकटामुळे घरकुल लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान प्रलंबीत असल्याने तातडीने घरकुल अनुदानाची थकबाकी द्यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेसचे महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुरू झाले. अनेकांनी आपल्या झोपड्या व घरे मोडकळीस काढून भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. प्रशासनाने मंजूरी दिल्याने घरकुल बांधकाम सुरू केले. आतापर्यंत सर्व लाभार्थ्यांना फक्त एक लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
घरे उभारली आहेत, परंतु पाया घातल्यानंतरही अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठविलेले नाही. त्यामुळे बांधकाम पूर्णपणे थांबले आहे. दुसरा हप्ता घरकुल लाभार्थ्यांना जुलै २०१९ मध्ये प्राप्त झाला होता. राज्य सरकार मार्फत निधी प्राप्त झाला होता. परंतु केंद्र सरकारने अद्याप घरकुल योजनेसाठी निधीची तरतूद केलेली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी सावकाराकडून उसनवार घेऊन घरकुलाचे छत उभारले मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने प्लास्टंरिंग अभावी घरकुल गळू लागले आहेत, तर कुणी भाड्याच्या घरात आश्रयाला आहेत. घर मालकांना घरभाडे देणेही कठीण झाले आहे लॉकडाऊनमुळे घरकुल लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे तर दुसरीकडे सावकाराकडून कर्जाची वसुली करण्याकरिता दबाव आणला जात आहे. नगरपरिषद तुमसर येथे लाभार्थ्यांनी चकरा मारूनही निधी प्राप्त होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. शासनाने घरभाडे देऊन निवाºयाची व्यवस्था करावी, असे निवेदनातून लाभार्थ्यांनी केली आहे.
प्रधानमंत्री घरकूल योजनेचा शुभारंभ शहरात काही दिवसापूर्वी करण्यात आला. सुरवातीचे दोन हफ्ते लाभार्थ्यांना देवून त्यांना मोठी आशा दाखविण्यात आली मात्र गत वर्षभरापासून घरकुलाचे हप्ते मिळाले नसल्याने लाभार्थी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने वेळीच मदत करावी, अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल.
- गौरीशंकर मोटघरे, काँग्रेस नेते तुमसर