कोरोना काळातील रक्कम द्या, अन्यथा कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:39+5:302021-09-11T04:36:39+5:30
आशा वर्कर व गटप्रवर्तक आरोग्य विभागाचा शेवटचा कणा आहे. त्यांचा गावाच्या प्रत्येक व्यक्तीशी आरोग्याच्या दृष्टीने नाळ जोडलेली असते. गत ...
आशा वर्कर व गटप्रवर्तक आरोग्य विभागाचा शेवटचा कणा आहे. त्यांचा गावाच्या प्रत्येक व्यक्तीशी आरोग्याच्या दृष्टीने नाळ जोडलेली असते. गत दोन वर्षापासून कोरोना संकटकाळात आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी घरोघरी जाऊन कोरोनाच रुग्णांच्या शोध मोहीम राबविली होती. यांच्याकडे काम तसा दाम या तत्वावर ७२ कामे आशा व गटप्रवर्तकांकडून शासन करवून घेत आहेत. कोरोनाविषयी बोलायचे झाल्यास आशा व गटप्रवर्तक यांनी आंदोलन करून आपल्या कोरोना काळातील हक्काचे पैसे प्राप्त करून घेतले. आता कोरोना नाही पैसाही नाही, असा निर्णय घेतला आहे. आशा वर्कर, गटप्रवर्तक मिळणारे पैसे शासनाने परिपत्रक काढून आता फक्त लस टोचणारे अर्थात एएनएम परिचारक, लस देण्याकरिता कोरोना ॲप वापरकर्ता शिक्षक व उपस्थित डॉक्टर, लस वहन प्रवास भत्ता यांना दोन ते पाचशे रूपये पर्यंत प्रतिदिनी अदा करण्यात येणारे आदेश काढले. पगारदार कर्मचाऱ्यांना मानधन आणि आता आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना मानधनातून वगळण्यात आले. परिणामी आशा वर्कर यांनी मानधनही नाही तर कोरोनाचे कामही करणार नाही. या आशयाचे निवेदन डॉ. रेखा रामटेके यांना दिले आहे. शिष्टमंडळामध्ये सुषमा कारेमोरे, कुंदा चवरे, सोनिया चवरे, मंगला गायधने, उषा मेश्राम, दिशा ठाकूर, कविता हटवार, शितल रामटेके, नीलिमा कांतोडे यांचा समावेश होता.