वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:28+5:302021-07-07T04:43:28+5:30
साहित्यिक व कलावंत विविध विषयांवर लेखन करून साहित्यांची निर्मिती करत असतात, तसेच लोककलावंत देखील विविध प्रकारच्या कलेचे विचार मंचावर ...
साहित्यिक व कलावंत विविध विषयांवर लेखन करून साहित्यांची निर्मिती करत असतात, तसेच लोककलावंत देखील विविध प्रकारच्या कलेचे विचार मंचावर सादरीकरण करून नागरिक व समाजाचे प्रबोधन करण्याचे महान कार्य करीत असतात. साहित्यांचे लेखन आणि कलेचे सादरीकरण करताना साहित्यिक व कलावंतांनी वृद्धावस्था गाठली असून त्यांना आता हे काम करणे अशक्य झाले आहे. राज्य शासनाने १९५५ पासून मानधन देणारी योजना कार्यान्वित केली असून अ, ब व क श्रेणीतील अशा निकषपात्र वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते; परंतु मागील तीन महिन्यांपासून साहित्यिक व कलावंतांना मानधन अदा करण्यात आले नसल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. शिष्टमंडळात भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, हरिदास बोरकर, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर आदींचा समावेश होता.